रात्री 'तो' शेजाऱ्याच्या घरात शिरला, जोड्यांचा घेत होता वास; 1 महिना तुरूंगवासाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 12:55 IST2024-10-23T12:54:30+5:302024-10-23T12:55:31+5:30

एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात लपून त्याच्या शेजाऱ्याच्या घरात शिरला. इथे त्याने जे केलं त्यासाठी त्याला आता 1 महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली.

Man sneak into neighbour house smell shoes get jailed | रात्री 'तो' शेजाऱ्याच्या घरात शिरला, जोड्यांचा घेत होता वास; 1 महिना तुरूंगवासाची शिक्षा!

रात्री 'तो' शेजाऱ्याच्या घरात शिरला, जोड्यांचा घेत होता वास; 1 महिना तुरूंगवासाची शिक्षा!

जगभरातील लोकांना वेगवेगळे शौक असतात. जे पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते करतात. श्रीमंत लोकांना हवं ते कसंही मिळू शकतं. पण सामान्य लोकांना त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी खूप समस्या येतात. काही लोकांचे शौक असे असतात ज्यामुळे लोक त्यांना वेडेही म्हणतात. असंच काहीसं ग्रीसमध्ये बघायला मिळालं. इथे एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात लपून त्याच्या शेजाऱ्याच्या घरात शिरला. इथे त्याने जे केलं त्यासाठी त्याला आता 1 महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली.

न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, 28 वर्षीय व्यक्ती आता तुरंगात आहे. तसेच त्याला थेरपीही देण्यात येणार आहे. थेरपी देणार म्हणजे नक्कीच त्याला काहीतरी समस्या असणार. तेच आम्ही सांगणार आहोत, ज्याबाबत वाचून तुम्हीही हैराण व्हाल.

या व्यक्तीने शेजाऱ्याच्या घरात घुसून ना काही चोरी केली, ना कुणाला इजा पोहोचवली. त्याने शेजाऱ्याच्या शूजचा म्हणजे जोड्यांचा वास घेतला. हे सगळं त्याने फूट फेटिशमुळे केलं. फूट फेटिश म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या पायांबाबत आकर्षण असणं किंवा चुकीचे विचार असणं. इतरांचे पाय किंवा शूज बघून, त्यांचा वास घेऊन अशा लोकांना उत्तेजना जाणवते. त्याने कोर्टात सांगितलं की, त्याला सुद्धा हे माहीत नाही की, त्याच्या मनात इतरांच्या शूजबाबत अशी भावना का आहे. अनेकदा त्याला या सवयीमुळे मान खाली घालावी लागली. त्याचा कुणालाही नुकसान पोहोचवण्याचा हेतू नव्हता.

या व्यक्तीच्या शेजाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की, या व्यक्तीने कधीही कुणाशी चुकीचा व्यवहार केला नाही. त्याला 8 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. याच्या शेजाऱ्याने घरातील एखाद्या सदस्याचे शूज बाहेर ठेवले होते. जेणेकरून शूजना हवा लागावी. पण अचानक त्याला दिसलं की, एक व्यक्ती शूजचा वास घेत आहे. ही असं करताना पकडली जाण्याची त्याची पहिलीच वेळ नाही. गेल्या सहा महिन्यात तिसऱ्यांदा त्याला असं करताना पकडण्यात आलं. 

Web Title: Man sneak into neighbour house smell shoes get jailed