वाह रे वाह! गरम झालं होतं कारचं इंजिन, थंड करण्यासाठी ड्रायव्हरने SUV कार नदीत बुडवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:50 IST2021-08-19T18:48:42+5:302021-08-19T18:50:13+5:30
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये इमरजन्सी सेवेच्या कर्मचाऱ्याने मंगळवारी एक एसयूव्ही कार याकिमा नदीत घेऊन गेला.

वाह रे वाह! गरम झालं होतं कारचं इंजिन, थंड करण्यासाठी ड्रायव्हरने SUV कार नदीत बुडवली
(Image Credit : GettyImages)
जुन्या गाड्यांमध्ये इंजिन गरम होण्यापासून वाचवण्यासाठी रेडिएटर असायचं. ज्यात वेळोवेळी ड्रायव्हरला पाणी भरावं लागत होतं. याने जास्त वेळ गाडी चालल्यावरही इंजिनच तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळत होती. अजूनही काही जुन्या गाड्यांमध्ये ही सुविधा असते. याबाबत अमेरिकेतील एका व्यक्तीने जे केलं ते वाचून हैराण व्हाल.
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये इमरजन्सी सेवेच्या कर्मचाऱ्याने मंगळवारी एक एसयूव्ही कार याकिमा नदीत घेऊन गेला. यानंतर जेव्हा त्याला वाचवण्यासाठी कर्मचारी पोहोचले तेव्हा ते ड्रायव्हरचं असं करण्याचं कारण वाचून हैराण झाले. रिपोर्टनुसार, ड्रायव्हरने असं मुद्दामहून केलं होतं. जेणेकरून रेडिएटरमध्ये आपोआप पाणी भरावं. याबाबत याकिमा काउंटी पोलिसांनी सांगितलं की, ड्रायव्हरचा दावा आहे की, त्याने मुद्दामहून असं केलं.
त्यांनी सांगितलं की, दिवसा जवळपास ११ वाजता एक व्यक्तीने कॉल करून माहिती दिली की, याकिमा नदीतील पाण्यात निळ्या रंगाची कार बुडत आहे. काउंटी शेरीफ कर्मचाऱ्याने सांगितलं की, नदीच्या जवळच वाहन पाण्यात आणि मालक कारजवळ दिसून आला.
रिपोर्टनुसार, वाहनाच्या मालकाने सांगितलं की, त्याने वाहनातील थर्मोस्टॅट बदललं आणि रेडिएटरमध्ये पाणी भरण्याची गरज होती. ड्रायव्हरने अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्याने मुद्दामहून एसयूव्ही कार पाण्यात टाकली, जेणेकरून रेडिएटरला पाणी मिळावं. नंतर गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात आली.