तोडलंस मित्रा... 'बाहुबली'मधलं कठीण गाणं त्यानं सहज गायलं, नेटकऱ्यांना 'याड' लावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 15:39 IST2020-05-30T15:37:33+5:302020-05-30T15:39:23+5:30

या व्हिडीओला आतापर्यंत फेसबुकवर 5.9 मिलियन वेळा पाहिला गेला आहे.

Man singing 'Baahubali' song 'Kaun Hain Voh' has left social media awestruck-SRJ | तोडलंस मित्रा... 'बाहुबली'मधलं कठीण गाणं त्यानं सहज गायलं, नेटकऱ्यांना 'याड' लावलं!

तोडलंस मित्रा... 'बाहुबली'मधलं कठीण गाणं त्यानं सहज गायलं, नेटकऱ्यांना 'याड' लावलं!

सोशल मीडियावर आपले टॅलेंट दाखवत अनेकजण रोतारात स्टार बनले आहेत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गायिका राणू मंडल. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या रानू मंडल यांना हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. त्यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार राणू मंडल यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. 

राणू मंडलप्रमाणेच सोशल मीडियावर सध्या एका गायकाची जोरदार चर्चा आहे. त्याच्या सुरेल आवाजातल्या एका गाण्यामुळे हा व्हिडीओ असा काही व्हायरल होतोय की आज त्याने प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला आहे. या तरूणाचं बाहुबलीमधील गाणं ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मित्रांनी गाण्याची फरमाईश केली म्हणून या तरूणाने गायलेले गाणे आज तुफान व्हायरल होत आहे. बागेत मित्रांची मैफल रंगली होती. यांत एकाने त्याला गाणे गाण्यास सांगितले. त्याने देखील कंटाळा न करता गाण्यास सुरूवात केली. बाहुबली चित्रपटातील सर्वात कठीण गाणे, त्याने अशा मधुर पद्धतीने गायले , की लोक त्याचे चाहते बनले आहेत. 

२०१५ मध्ये आलेल्या 'बाहुबली - द बिगनिंग' चित्रपटातील 'कौन है वो ...' हे गाणे गाताना तो पाहायला मिळत आहे. चित्रपटातील मुळ गाणे कैलाश खेर आणि मौनीमा यांनी हे गायले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या तरूणाचा व्हिडीओ पाहून अनेकजण त्याला रिएलिटीशोमध्ये जाण्याचा सल्ला देत आहे. जेणे करून त्याच्या या टॅलेंटला मोठे प्लॅटफॉर्म मिळु शकेल.

युजर्स त्याचे हे गाणे ऐकून वेगवेगळे गाणे गाण्याची देखील फरमाईश करत आहेत. ३ मिनीटाचा हा व्हिडीओ आहे. जो कोणी हा व्हिडीओ पाहत आहे, ते कमेंटस देऊन निःशब्द, मंत्रमुग्ध झालो अशा कमेंटस करत लाईक्सचादेखीव वर्षाव करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत फेसबुकवर 5.9 मिलियन वेळा पाहिला गेला आहे.

Web Title: Man singing 'Baahubali' song 'Kaun Hain Voh' has left social media awestruck-SRJ