व्हॉट्सअॅप मेसेज आला अन् नवरदेव मंडपातून छुमंतर झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 18:48 IST2018-06-22T18:48:21+5:302018-06-22T18:48:21+5:30
नवरदेवाने लग्न का मोडलं? याचं कारण वाचून सगळ्यांनाच धक्का बसेल.

व्हॉट्सअॅप मेसेज आला अन् नवरदेव मंडपातून छुमंतर झाला!
बहराइच- उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बेगमपूरमध्ये गुरूवारी रात्री एका प्रियकराने प्रेयसीचा संस्कार सुरू होण्यापूर्वीच मोडला. लग्न मंडपात सात फेरे घेण्याच्या आधी नवरदेवाच्या व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजमुळे ते लग्न मोडलं. व्हॉट्सअॅपवरील मेसेज पाहून नवरदेवाने तात्काळ लग्नाचे विधी थांबवत लग्न मोडलं.
नवरदेवाने लग्न का मोडलं? याचं कारण वाचून सगळ्यांनाच धक्का बसेल. ज्या मुलीशी या नवरदेवाचं लग्न होणार होतं त्या मुलीच्या आधीच्या प्रियकराने त्याचे व लग्न असलेल्या तरूणीचे फोटो नवरदेवाला व्हॉट्सअॅपवर पाठवले. हे फोटो पाहून संतापलेल्या प्रियकराने तात्काळ लग्न मोडून तो मांडवातून निघून गेला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकराला शोधून त्याला तुफान मारहाण केली.
रामगावमधील बेगमपूरमध्ये उमा शंकर चौहान यांच्या मुलीचं लग्न होतं. सगळे जण आनंदात लग्न मंडपात आले. विधीही सुरू होते.
पाहुण्याचं जेवण व इतर कार्यक्रम आटोपल्यावर अचानक नवरदेवाच्या मोबाईलवर मेसेजेस यायला लागले. सतत मेसेज येत असल्याने त्याने व्हॉट्सअॅप तपासलं. नवरदेवाला व्हॉट्सअॅपवर त्याच्या होणाऱ्या पत्नीचे व तिच्या प्रियकराचे फोटो आले होते. हा सर्व प्रकार पाहून नवरदेव लग्नमंडपातून उठून गेला.