शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 17:30 IST2025-10-22T17:26:48+5:302025-10-22T17:30:03+5:30
जेव्हा डोळ्यावर प्रकाश पडतो तेव्हा तो अक्षरशः चमकतो, एखाद्या चित्रपटातील पात्राच्या "जादूच्या डोळ्यासारखा" त्याचा डोळा दिसतो.

शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
अमेरिकेतील अलबामा येथील ज्वेलरी स्टोरचा मालक स्लेटर जोन्सची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. आजारपणामुळे त्याला आपला उजवा डोळा गमावला, परंतु जेव्हा डोळा लावण्याची वेळ आली तेव्हा त्याने तो अगदी खास तयार करून घेतला. त्याने चक्क डोळ्यात २ कॅरेटचा खरा हिरा बसवला. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
स्लेटरने त्याच्या कृत्रिम डोळ्यात २ कॅरेटचा हिरा बसवला आहे. त्याच्या मते, जर त्याला कृत्रिम डोळा लावायचा असेल तर तो त्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात असल्याने एका वेगळ्या पद्धतीने हे करेल. त्याने कृत्रिम डोळे बनवणारा एक्सपर्ट जॉन लिमकडून कस्टम-मेड डायमंड आय बनवून घेतला. जेव्हा या डोळ्यावर प्रकाश पडतो तेव्हा तो अक्षरशः चमकतो, एखाद्या चित्रपटातील पात्राच्या "जादूच्या डोळ्यासारखा" त्याचा डोळा दिसतो.
An Alabama jeweler who lost his eye replaced it with a 2 carat diamond set prosthesis pic.twitter.com/UrZlDxMfsL
— Rogue Fashion (@rogue) March 21, 2025
रिपोर्टनुसार, हा 'जगातील सर्वात महागडा कृत्रिम डोळा' आहे. जॉन लिमन दिलेल्या माहितीनुसार, त्याने १०,००० हून अधिक कृत्रिम डोळे तयार केले आहेत, परंतु जोन्सचा डोळा सर्वात मौल्यवान आणि अद्वितीय आहे. डोळा आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचं प्रतीक बनला आहे.
स्लेटरने त्याच्या 'डायमंड आय'चे फोटो शेअर करताच, इंटरनेटवर विविध कमेंट्स आल्या. काहींनी तो हँडसम दिसत असल्याचं म्हटलं. तर काहींनी "एवढ्या महागड्या हिऱ्यासह फिरणं धोकादायक आहे" असं म्हणत त्याला इशारा दिला आहे. सध्या स्लेटर जोन्सची आणि त्याच्या डोळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.