शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

२८ बोटं असलेल्या देवेंद्रचं गिनीज बुकमध्ये नाव, मात्र जगण्याचा संघर्ष सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:49 PM

अनेकदा सामान्यांपेक्षा अधिक बोटं असणाऱ्या व्यक्तींबाबत ऐकायला, वाचायला मिळत असतं. भारतात एक अशीच व्यक्ती आहे ज्याला हात आणि पायांना ७-७ बोटे आहेत.

(Image Credit : Daily Mail)

अनेकदा सामान्यांपेक्षा अधिक बोटं असणाऱ्या व्यक्तींबाबत ऐकायला, वाचायला मिळत असतं. भारतात एक अशीच व्यक्ती आहे ज्याला हात आणि पायांना ७-७ बोटे आहेत. देवेंद्र सूथर असं या व्यक्तीचं नाव असून यासाठी त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. देवेंद्र जगातला असा एकुलता एक आहे. त्याला मॅक्सिमम फिंगर्स मॅन असं म्हटलं जातं. गुजरातच्या हिंमतनगरमध्ये राहणाऱ्या देवेंद्रला जन्मापासूनच पॉलीडॅक्टली नावाचा आजार आहे. पण याचं त्याला अजिबात दु:खं नाही. तो म्हणतो की, तो याने परेशान आहे, पण निराश नाही. 

एक हजारात असतो असा एक व्यक्ती

(Image Credit : Guinness World Records)

देवेंद्रला २८ बोटे आहेत. गर्भात ७व्या किंवा ८व्या महिन्यात भ्रूणात जास्त बोटे विकसित होतात. एका आकडेवारीनुसार, जगभरात ७०० ते १००० मध्ये अशी एक केस असते. पण प्रेग्नेंसी दरम्यान अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून याची माहिती मिळवता येते. बॉस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटलनुसार, विकसित देशांमध्ये अशा केसेस समोर आल्यावर आणि बाळ दोन महिन्यांचं झाल्यावर सर्जरीच्या माध्यमातून त्यांची अधिकची बोटे काढली जातात. अशा स्थितीतही देवेंद्र निराश नाही. त्याला दोन अपत्ये आहेत आणि तो कापरेंटरचं काम करतो. तो सांगतो त्याला शूज घेताना फार अडचण होते. 

२०१० मध्ये गिनीज बुकमध्ये नाव

(Image Credit : Metro)

अशीच एक केस भारतात अक्षतमध्ये बघण्यात आली होती. त्याच्याही हाता-पायांना ७-७ बोटे होती. आणि २०१० मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं नाव नोंदवण्यात आलं होतं. पण नंतर सर्जरी करून त्याची बोटे काढण्यात आली होती. त्यामुळे सध्या हा रेकॉर्ड देवेंद्रच्या नावावर आहे. 

आर्थिक तंगीमुळे सर्जरी टाळली

(Image Credit : Daily Mail)

देवेंद्रला गिनीज बुकमध्ये नाव गेल्याने जगभरात प्रसिद्धी तर मिळाली, पण त्याला काही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळेच तो सर्जरी करू शकला नाही. आता वाढत्या वयानुसार त्याची बोटे आणखी कठोर होत आहेत. त्यामुळे त्याला काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

टॅग्स :Gujaratगुजरातguinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड