शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

लाईनमध्ये उभं राहा, भरपूर कमवा; पठ्ठ्यानं शोधलाय अनोखा व्यवसाय, आहे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 4:39 PM

आता त्याचा व्यवसाय इतका प्रसिद्ध झालाय की त्यानं आपल्या हाताखालीही कामासाठी मुलं ठेवली आहे. वाचा काय आहे ही रंजक कहाणी.

जगभरातील लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी सतत्यानं मेहनत करत असतात. दुसरीकडे जे लोक नोकरी करतायत तेदेखील आपलं काम पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहेत. पण कल्पना करा की जर एखाद्या व्यक्तीनं फक्त रांगेत उभं राहून भरपूर पैसे कमावले तर? हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. लंडनमध्ये एक व्यक्ती अशी आहे  की जी नुसती रांगेत उभी राहून मोठी रक्कम कमावते. ही व्यक्ती इतकी प्रसिद्ध झालीये की ती आता श्रीमंत व्यक्तींसाठीही रांगेत उभी राहते.

तो लंडनचा रहिवासी असून त्याचे नाव फ्रेडी बेकिट आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, या व्यक्तीने स्वत: सोशल मीडियावर आपली कहाणी सांगितली आहे. एखाद्या म्युझिक कॉन्सर्टची तिकिटे काढण्यासाठी किंवा एक्झिबिशनची तिकिटे काढण्यासाठी लोक त्याला रांगेत उभे राहण्यासाठीच शोधतात, असंही त्यानं सांगितलं.

तासभर रांगेत थांबण्याऐवजी तो २० पौंड (सुमारे २ हजार रुपये) आकारतो, असेही रिपोर्टमध्ये म्हटलंय. इतकंच नाही तर अनेकवेळा लोक केवळ बँका किंवा इतर आस्थापनांमध्ये रांगेत उभं करण्यासाठी त्यालाच शोधत असतात. या कामासाठी तो आता चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे त्याला या कामात आनंद मिळतोय आणि या कामाद्वारेदेखील तो चांगली रक्कम मिळवत आहे.

रिपोर्ट्सनुसार तो पगार मिळवणाऱ्यापेक्षाही तो जास्त पैसे कमावतो. ही व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून हेच काम करत आहे. सध्या त्यानं आपल्यासोबत अनेक मुलंही ठेवली आहेत. जेव्हा कोणी आपल्याशी संपर्क साधत तेव्हा त्या मुलांना रांगेत उभं राहण्यासाठी पाठवलं जातं, असंही तो म्हणाला. सध्या या व्यक्तीची ही कहाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल