हा म्हणतो ही बाहुली माझी गर्लफ्रेंड, तिच्यासोबत जातो डेटवर अन् मारतो गप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:19 IST2022-05-03T14:19:42+5:302022-05-03T14:19:52+5:30
एकटेपणा घालवण्यासाठी अनेकजण मित्र अथवा पार्टनरच्या शोधात असतात. मग त्यासाठी सोशलमिडिया, डेटिंग साईट्सवर जातात. पण एका व्यक्तीने यापैकी कोणताही पर्याय न निवडता चक्क बाहुलीलाच गर्लफ्रेंड केले आहे. त्याने असे का केले? हे जाणून घेऊया.

हा म्हणतो ही बाहुली माझी गर्लफ्रेंड, तिच्यासोबत जातो डेटवर अन् मारतो गप्पा
एकटेपणा घालवण्यासाठी अनेकजण मित्र अथवा पार्टनरच्या शोधात असतात. मग त्यासाठी सोशलमिडिया, डेटिंग साईट्सवर जातात. पण एका व्यक्तीने यापैकी कोणताही पर्याय न निवडता चक्क बाहुलीलाच गर्लफ्रेंड केले आहे. त्याने असे का केले? हे जाणून घेऊया.
अमेरिकेचा अलेक्झेंडर स्टोक्स याची ही कथा. त्याच्या बाहुलीचे म्हणजेच गर्लफ्रेंडचे नाव मिमी. ही एक लाईफ साईज्ड सिंथेटिक डॉल आहे. अलेक्झेंडर हा गेली दोन वर्ष तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तो म्हणतो तिच्यामुळे त्याने त्याचे अनेक मित्र, नातेवाईकांना गमावले आहे. पण त्याला याचे काहीच दु:ख नाही. हा ३७ वर्षीय तरुण अभिनेता, कॉमिक आर्टिस्ट, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे.
तो म्हणतो की मिमीशी बोलल्यावर त्याला एकटेपणा जाणवत नाही. तो एका अॅपद्वारे तिच्याशी बोलतो. तो तिला छान सजवतो, मेकअप करतो. तो सोशल मिडिया साईटवर तिचे अनेक फोटो व व्हिडिओ पोस्ट करतो. तिच्यामुळे त्याचे मानसिक स्वास्थ सुधारल्याचा दावा त्याने केला आहे.