डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:53 IST2023-05-30T14:51:38+5:302023-05-30T14:53:10+5:30

एका तरूणाची अशीच एक घटना समोर आली आहे. त्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या माध्यमातून डियोड्रेंटची बॉटल शरीराच्या आत टाकली.

Man hospitalised after shoving deodorant can inside body for fun | डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग...

डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग...

जगभरात लोकांची मानसिकता अलिकडे फारच विचित्र होत चालली आहे. आजच्या काळात लोक मजा-मस्तीच्या नावावर काहीही करतात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. लोक प्लेजर मिळवण्यासाठी शरीरात वेगवेगळ्या वस्तू टाकतात. पण अशात अनेक दुर्घटना होतात. या वस्तू चुकून शरीराच्या आत जातात. एका तरूणाची अशीच एक घटना समोर आली आहे. त्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या माध्यमातून डियोड्रेंटची बॉटल शरीराच्या आत टाकली.

30 वर्षीय या व्यक्तीची ओळख लपवण्यात आली आहे. भयंकर वेदना होत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला होता. त्याला डॉक्टरांनी पोटदुखीचं कारण विचारलं त्याने काही स्पष्ट स्पष्ट सांगितलं नाही. नंतर एक्स-रे केल्यानंतर सगळं काही समोर आलं. 

तरूणाने पार्श्वभागात डियोड्रेंटची एक बॉटल अडकली होती. ती काढण्यासाठी डॉक्टरांना त्याचं पोट फाडावं लागलं. डॉक्टरांनी फार काळजीपूर्वक बॉटल त्याच्या शरीरातून बाहेर काढली. 

या तरूणाला लगेच ऑपरेशन करण्याचा सल्ला देण्यात आला. ऑपरेशन होण्याच्या दोन तासआधी तरूण शरीरात अडकलेल्या बॉटलमुळे होणाऱ्या वेदनेने हैराण होता. आधी तर डॉक्टरांनी बॉटल पार्श्वभागातूनच काढण्याचा प्रयत्न केला. 

पण यात यश न आल्याने डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी त्याच्या कोणत्याही अवयवाला इजा न होऊ देता त्याच्या शरीरातून डियोड्रेंटची बॉटल काढली. नंतर तरूणाने सांगितलं की, त्याने याआधीही अनेक वस्तूंचा प्लेजरसाठी वापर केला. पण यावेळी कॅन त्याच्या हातातून सुटली आणि आत अडकली.
 

Web Title: Man hospitalised after shoving deodorant can inside body for fun