हा आहे तब्बल ४७ मुलांचा बाप तोही बिनलग्नाचा, आणखी ३० मुलं येणार जन्माला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:07 IST2022-05-02T13:02:47+5:302022-05-02T13:07:19+5:30
लग्न न करता ४७ मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीबद्दल माहिती आहे का? ही व्यक्ती कशी काय इतक्या मुलांचा बाप असू शकते असं तुम्हाला वाटतं असेल तर तुमच्या माहितीसाठी हा माणूस एक स्पर्म डोनर आहे.

हा आहे तब्बल ४७ मुलांचा बाप तोही बिनलग्नाचा, आणखी ३० मुलं येणार जन्माला...
तुम्ही अनेक असे पुरुष पाहिले असतील ज्यांच्या अनेक बायका अन् कित्येक मुले आहेत. पण लग्न न करता ४७ मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीबद्दल माहिती आहे का? ही व्यक्ती कशी काय इतक्या मुलांचा बाप असू शकते असं तुम्हाला वाटतं असेल तर तुमच्या माहितीसाठी हा माणूस एक स्पर्म डोनर आहे.
केल गार्डी हा युवक स्पर्म डोनर आहे. त्याची आतापर्यंत स्पर्म डोनेशन मधुन झालेली ४७ मुले आहेत. आणखी ३० मुले या जगात येणार आहेत. केलला इन्स्टाग्राम व इतर सोशल साईट्सवर स्त्रिया स्पर्म डोनेशनसाठी मेसेज पाठवतात. यातील काही मुलांचे फोटोही ते पाठवतात. यापैकी काही स्त्रियांना त्याने डेटही केले आहे. मात्र त्याची कोणतीच डेट यशस्वी झालेली नाही.
केलच्या रिलेशनशिपमध्ये या स्पर्म डोनेशनमुळे अनेक अडचणी येतात. त्याच्या गर्लफ्रेंड त्याला सोडुन जातात. केल म्हणतो त्याला आता समजुतदार आणि त्याचा व्यवसाय समजुन घेणारी पार्टनर पाहिजे.