शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 20 वर्षानंतर समजलं पत्नीचं एक सीक्रेट, आता घटस्फोट देतोय पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 09:11 IST

पत्नीचं कॉलेज वेळचं एक सीक्रेट समजलं. ज्यामुळे तो बिथरला. हे त्याला सहन होत नाहीये.

प्रेम, लग्नाबाबत वेगवेगळ्या अजब घटना सोशल मीडियावर समोर येत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका व्यक्तीने त्याची कहाणी शेअर केली. त्याने लोकांसोबत त्याच्या जीवनातील समस्या शेअर केली. त्याने सांगितलं की, त्याच्या लग्नाला 20 वर्षे झालीत. पण पत्नीचं कॉलेज वेळचं एक सीक्रेट समजलं. ज्यामुळे तो बिथरला. हे त्याला सहन होत नाहीये.

त्याने सांगितलं की, पत्नीने त्याला रिलेशनशिपच्या सुरूवातीच्या दिवसांमधेच दगा दिला होता. तेव्हा त्याला याबाबत माहीत नव्हतं. पण ते आता त्याला समजलं. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, तो म्हणाला की, तो त्याच्या पत्नीला पहिल्यांदा हायस्कूलमध्ये भेटला होता.

तो एक वर्षाने सीनिअर होता. दोघेही प्रेमात पडले. डेटिंग सुरू केलं. रिलेशनशिप चांगलं सुरू होतं. मधला काही काळ दोघे एकमेकांपासून दूर राहिले. पण तेव्हाही सगळं काही ठीक होतं. नंतर त्यांनी लग्न केलं. कपलला दोन मुले आहेत. लग्नाची ही 20 वर्ष आनंदात गेली.

तो म्हणाला की, पत्नीने त्यांच्या रिलेशनशिपच्या दिवसांमध्ये असं काही केलं होतं जे आजपर्यंत सीक्रेट होतं. पण त्याला त्याबाबत आता समजलं आहे. ज्यामुळे त्याला धक्का बसला. तो पत्नीला माफ करू शकत नाहीये आणि तिला घटस्फोट देत आहे.त्याने सांगितलं की, पत्नीच्या कॉलेजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात दोघांचं लॉंग डिस्टेंस रिलेशनशिप सुरू होतं. यादरम्यान त्याने एक वर्ष हायस्कूल आणि दुसरं कम्युनिटी कॉलेजमध्ये घालवलं. नंतर दोघांनीही एकाच शहरात एकाच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तेव्हापासून दोघे सोबत राहिले. ग्रॅजुएशननंतर लग्न केलं.

काय होतं सीक्रेट 

या व्यक्तीने खुलासा केला की, ख्रिसमसच्या दिवशी तो पत्नीसोबत कॉलेजच्या काही मित्राना भेटला. पत्नी म्हणाली की, ती या पुरूषांना हायस्कूलवेळी भेटली होती. यातील एक पुरूष म्हणाला की, हायस्कूल किती चांगलं होतं आणि कॉलेजचं ते वर्षही शानदार होतं.

बस इथे पत्नी म्हणाली की, ती आता पुढे काही बोलणार नाही. पतीने पत्नीला विचारलं पण ती गप्प राहिली. पण नंतर ती बोलण्यास तयार झाली. 

तिने सांगितलं की, तिने कॉलेजच्या त्या दोन वर्षांमध्ये अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवले. ती म्हणाली की, ही काही फार मोठी बाब नव्हती, कारण तिचं लॉंग डिस्टेंस रिलेशनशिप सुरू होतं. तेव्हा तिला वाटत नव्हतं की, तिचं रिलेशनशिप इतकं लांब चालेल.

व्यक्तीला त्याच्या पत्नीने सांगितलं की, तिने 10 पुरूषांसोबत संबंध ठेवले आहे, ज्यातील 3 पुरूषांसोबत त्याने भेट करून दिली होती. यातील एकासोबत ती आजही बोलते. हे समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्तीने घटस्फोटासाठी अर्ज केला. परिवाराने त्याला सांगितलं की, भूतकाळातील चुकांमुळे असा निर्णय घेणं योग्य नाही. त्यांच्या एका मुलाचं वय 17 तर दुसऱ्याचं 19 वर्षे आहे. व्यक्ती म्हणाला की, त्याला आशा आहे की, मुलं त्याचा हा निर्णय समजून घेतील.

तो म्हणाला की, मी माझ्या विश्वासावर कायम आहे. अनेक वर्ष अनेक पुरूषांसोबत संबंध ठेवून मला दगा देणं स्वीकार नाही. हे कधीही झालेलं असो पण हे सत्य आहे की, तिने माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहत असताना इतर लोकांसोबत संबंध ठेवले. हे मी स्वीकार करू शकत नाही. हा माझा अपमान आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेRelationship Tipsरिलेशनशिप