8 हजारात खरेदी केलं होतं 125 वर्ष जुनं कपाट, आत जे दिसलं त्याने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 10:35 AM2023-12-11T10:35:04+5:302023-12-11T10:36:42+5:30

एका व्यक्तीचं नशीब भंगारातील एका कपाटाने बदललं. एमिल नावाच्या एका व्यक्तीने 125 वर्ष जुनं एक कपाट खरेदी केलं होतं.

Man finds treasure worth millions hidden in 125 years old cabinet, but he returns to Owner | 8 हजारात खरेदी केलं होतं 125 वर्ष जुनं कपाट, आत जे दिसलं त्याने बदललं आयुष्य

8 हजारात खरेदी केलं होतं 125 वर्ष जुनं कपाट, आत जे दिसलं त्याने बदललं आयुष्य

ते म्हणतात ना की, एखाद्या व्यक्तीचं नशीब चमकायला काही वेळ लागत नाही. अचानक एखाद्या व्यक्तीकडे इतके पैसे येतात ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. तेच नशीब खराब असेल तर श्रीमंत व्यक्तीही रस्त्यावर येऊ शकते. अशा अनेक घटना नेहमीच समोर येत असतात.

2015 मध्ये टेक्सासमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचं नशीब भंगारातील एका कपाटाने बदललं. एमिल नावाच्या एका व्यक्तीने 125 वर्ष जुनं एक कपाट खरेदी केलं होतं. अॅंटीक समजून घरी आणलेल्या या कपाटाने एमिलचं जीवनच बदललं. त्याने विचारही नव्हता केला की, केवळ 8 हजारात घेतलेल्या कपाटात त्याला खजिना मिळेल. ज्याने त्याचं जीवन बदलेल. हा खजिना मिळाल्यानंतर एमिलने जे केलं, त्याने सगळ्यांची मनं जिंकली.

ही घटना 2015 मधील आहे. पण पुन्हा एकदा याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एमिलचं नशीब कसं बदललं ते दिसतं. एमिलने 125 वर्ष जुनं एक कपाट खरेदी केलं होतं. त्याला या कपाटावरील मार्बल वर्क ओइर वुड फिनिशिंग खूप आवडली. याच कारणाने त्यानी 8 हजार रूपयात हे कपाट खरेदी केलं. यात एमिलला जे सापडलं त्याची त्याने कल्पनाही केली नसेल.

एमिलने हे कपाट घरी आणलं आणि आपल्या डायनिंग रूममध्ये ठेवलं. कपटा ठेवताना त्याला आतून कशाचातरी आवाज ऐकू आला. एमिलने आपल्या मुलासोबत कपाट चेक केलं. काही वेळाने त्याना दिसलं की, कपाटात एक सीक्रेट कप्पा होता. यात मौल्यवान रत्न, हार, सोन्याचे दागिने होते. कायद्याने हा खजिना एमिलचा होता. पण त्याने याला चोरी मानलं. त्याने लगेच कपाटाच्या मालकाला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. कपाट ज्याचं होतं त्याचा मृत्यू झाला होता. पण त्याच्या मुलाला एमिलने खजिना परत केला. यासाठी त्याने एमिलचे धन्यवाद मानले.

Web Title: Man finds treasure worth millions hidden in 125 years old cabinet, but he returns to Owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.