न केलेल्या गुन्ह्यासाठी भोगली त्याने २८ वर्षांची शिक्षा, आता मिळाली 'इतक्या' कोटींची नुकसान भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 10:57 AM2021-01-05T10:57:52+5:302021-01-05T10:59:11+5:30

आता हॉलमॅनची सुटका करण्यात आली आहे. मात्र, आता त्याला कोट्यवधी रूपयांचा नुकसान भरपाई मिळणार  आहे.

Man falsely imprisoned 28 years gets Rs 71 Crore compensation | न केलेल्या गुन्ह्यासाठी भोगली त्याने २८ वर्षांची शिक्षा, आता मिळाली 'इतक्या' कोटींची नुकसान भरपाई!

न केलेल्या गुन्ह्यासाठी भोगली त्याने २८ वर्षांची शिक्षा, आता मिळाली 'इतक्या' कोटींची नुकसान भरपाई!

googlenewsNext

अमेरिकेच्या फिलाडेल्फियाची ही घटना आहे. येथील चेस्टर हॉलमनला २८ वर्ष तुरूंगवास भोगावा लागला तेही त्या गुन्ह्यासाठी जो त्यांने केलाच नाही. १९९१ मध्ये त्याच्यावर हत्येचा आरोप होता. नंतर मुख्य साक्षीदाराने सांगितलं की चुकून त्याने होलमॅनवर आरोप लावला होता. आता हॉलमॅनची सुटका करण्यात आली आहे. मात्र, आता त्याला कोट्यवधी रूपयांचा नुकसान भरपाई मिळणार  आहे.

कोट्यवधीची नुकसान भरपाई

सिस्टीमच्या चुकीमुळे चेस्टरचे २८ वर्षे अंधाऱ्या कोठडीत गेली. या विरूद्ध त्याने फिलाडेल्फिया सरकार विरोधात केस दाखल केली होती. आता नुकसान भरपाई म्हणून त्याला ७२ कोटी रूपये मिळणार आहेत. फिलाडेल्फियाच्या कनविक्शन इंटीग्रीटी यूनिटचे प्रमुख पॅट्रिका क्युमिंग्सने चेस्ट हॉलमॅनला २०१९ मध्ये ४९ वर्षे वयात या कारवाईसाठी माफी मागितली.

या यूनिटने माफी मागण्याआधी १५ महिन्यांपर्यंत पुन्हा पूर्ण तपास केला. अनेक चुका समोर आल्या. पोलिसांनी जो तपास केला त्यातून हेही समोर आलं की, या केसमधील एक दुसरा संशयित दुर्लक्षित झाला. क्युमिंग्सने हॉलमॅनला माफी मागितल्यावर सांगितले की मी असफल झालो. आम्ही पीडित व्यक्तीसोबतच फिलाडेल्फियाच्या लोकांसमोरही फेल झालोत.

हॉलमॅन म्हणाला की, 'मी जी २८ वर्षे गमावली आहेत. त्याबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्या परिवाराला त्रास सहन करावा लागला, त्यांना टिकेचा सामना करावा लागला त्याची भरपाई होऊ शकत नाही. माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी हा फार कठिण काळ होता. न्याय मिळवण्यासाठी लढावं लागतं. जर तुमची चूक नसेल तर न्याय मिळतो सुद्धा. पण ही लढाई निर्भिडपणे लढावी लागते'.
 

Web Title: Man falsely imprisoned 28 years gets Rs 71 Crore compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.