Man decapitated woman and eats her brain as a topping on rice in Philippines | धक्कादायक! इंग्रजीत बोलत होती महिला, आधी तिचं डोकं कापलं नंतर मेंदू खाल्ला!
धक्कादायक! इंग्रजीत बोलत होती महिला, आधी तिचं डोकं कापलं नंतर मेंदू खाल्ला!

फिलीपिन्समध्ये एक फारच धक्कादायक आणि विकृत घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने कथित रूपाने आधी महिलेचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि नंतर तिचा मेंदू काढून खाल्ल्याची घटना घडली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गुरूवारी पोलिसांनी Lloyd Bagtong नावाच्या २१ वर्षीय तरूणाला एका अज्ञात महिलेल्या हत्येच्य संशयावरून अटक केली. पोलिसांना तरूणाच्या घरापासून काही अंतरावर महिलेशी संबंधित अवयव सापडले. 

त्याला इंग्रजी समजत नव्हती

या तरूणाने कथित रूपाने पोलिसांना सांगितले की, त्याला त्यावेळी भूक लागली होती आणि तो नशेत होतात. ती महिला इंग्रजीमध्ये काहीतरी बोलत होती. पण त्याला ती जे बोलतेय ते कळत नव्हतं. यावर पोलीस अधिकारी मारिबेथ रामोगा हे एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की, त्याला राग आला होता.

बेरोजगार तरूण

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, लॉयड हा बेरोजगार आहे. यांनीच त्याला जिथे महिलेचा मृतदेह सापडला तिथे महिलेच्या बाजूने चालताना पाहिले होते. त्यांना संशय आहे की, आधी त्याने महिलेचा जीव घेतला. नंतर मोठ्या चाकूने तिचं डोकं धडापासून वेगळं केलं आणि एका कापडात गुंडाळून घरी घेऊन गेला.

विकृतीचा कळस

या तरूणाने पोलिसांना सांगितले की, त्याने सर्वातआधी भात तयार केला. नंतर महिलेचा मेंदू त्यावर ठेवून खाल्ला. त्यानंतर त्याने घराजवळील एका खड्ड्यात महिलेचं डोकं फेकून दिलं. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर केवळ जीन्स होती. तिचे हात बांधलेले होते. पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतलं असून त्याची मानसिक स्थिती तपासण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं आहे.

या तरूणाच्या प्रॉपर्टीमध्येच महिलेच्या रक्ताने माखलेले कपडे सापडलेत. त्यांना असं वाटतंय की, या कपड्यात त्याने महिलेचं डोकं घरी आणलं असेल. पोलीस अजूनही महिलेची ओखळ पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 


Web Title: Man decapitated woman and eats her brain as a topping on rice in Philippines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.