तरूणाने एकाच वेळी ३-३ महिलांना फिरवले, त्यांच्याकडून घेतलेले पैसे खऱ्या गर्लफ्रेन्डवर उडवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:44 IST2024-11-27T14:43:19+5:302024-11-27T14:44:02+5:30
प्रेमाचं नाटक करून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, एक व्यक्तीने फसवणुकीच्या बाबतीत कहरच केला.

तरूणाने एकाच वेळी ३-३ महिलांना फिरवले, त्यांच्याकडून घेतलेले पैसे खऱ्या गर्लफ्रेन्डवर उडवले!
जगात एकापेक्षा कारनामे करणारे लोक आहेत. काही लोक असे असतात ज्यांची फसवणूक होते. तर काही लोक असे असतात जे लोकांना चूना लावण्याचं काम करतात. प्रेमाचं नाटक करून फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, एक व्यक्तीने फसवणुकीच्या बाबतीत कहरच केला.
चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने असा काही कारनामा केला ज्याबाबत वाचून सगळेच हैराण झाले. प्रेमात व्यक्ती आंधळे होतात असं तुम्ही ऐकलं असेलच. दुसऱ्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे अनेकांना माहीत नसतं. असंच काहीसं तीन महिलांसोबत झालं. तीन महिलांसोबत प्रेमाचं नाटक करून या व्यक्तीने त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे आपल्या खऱ्या गर्लफ्रेन्डवर उडवले.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चीनच्या शांक्सी प्रांताच्या वुगॉन्ग काऊंटीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने प्रेमाचा एकप्रकारे बिझनेसच केला होता. त्याने एकाच वेळी ३-३ घटस्फोटीत आणि एकट्या राहणाऱ्या महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. तो त्यांच्या कधी आजाराचं कारण सांगता किंवा कधी घरी काही काम असल्याचं सांगत त्यांच्याकडून पैसे घेत होता. अशाप्रकारे मूर्ख बनवत त्याने या महिलांकडून साधारण ६३ लाख २४ हजार रूपये लुटले. जेव्हा महिलांनी त्याला पैसे परत मागितले तर तो कारणं देऊ लागला.
जेव्हा हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी वांग नावाच्या या व्यक्तीला अटक केली. अटकेनंतर समोर आलं की, तो महिलांकडून लुटलेले पैसे त्यांच्या खऱ्या गर्लफ्रेन्डवर उडवत होता. तो तिला महागडे गिफ्ट देत आणि फिरायला नेत होता. पुढे प्रकरण कोर्टात गेल्यावरत्याला ८ वर्षांची शिक्षा झाली आणि ६ लाख रूपयांचा दंडही ठोठावला गेला.