ऑगस्टमध्ये २० लाख लोक जगातून अचानक गायब होणार; 'टाईम ट्रॅव्हल' केलेल्या व्यक्तीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 16:49 IST2022-05-10T16:46:25+5:302022-05-10T16:49:45+5:30
भूकंप, हल्ला! २०२२ मध्ये अनेक संकटं येणार असल्याचा दावा

ऑगस्टमध्ये २० लाख लोक जगातून अचानक गायब होणार; 'टाईम ट्रॅव्हल' केलेल्या व्यक्तीचा दावा
टाईम ट्रॅव्हलिंग ही वैज्ञानिक संज्ञा अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. बऱ्याचशा साय-फाय चित्रपटांत टाईम ट्रॅव्हलिंग पाहायला मिळतं. यासंदर्भात अनेकदा अजबगजब दावे केले जातात. असाच दावा आता आणखी एका व्यक्तीनं केला आहे. आपण भविष्याची यात्रा करून आल्याचा दावा या व्यक्तीचा आहे. हा व्यक्ती इथेच थांबलेला नाही. तर काही महिन्यांत जगातून २० लाख लोक गायब होतील, असादेखील दावा त्यानं केला आहे.
डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, कॉही नियोनार्ड नावाच्या एका टिकटॉकरनं त्याच्या एका व्हिडीओत धक्कादायक दावे केले आहेत. कॉहीचा व्हिडीओ एका दुसऱ्या टिकटॉक अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात भविष्याबद्दल अजब दावे करण्यात आले आहेत. २०२२ मध्ये अनेक धक्कादायक घटना असतील, असे दावे कॉही नावाच्या टाईम ट्रॅव्हलरच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार केले गेले आहेत.
१४ जुलै २०२२ रोजी अमेरिकेत भयंकर भूकंप येईल. त्यामुळे तेथील जमीन दोन भागांमध्ये विभागली जाईल, असा दावा व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. ९ ऑगस्टला जगातून २० लाख लोक अचानक गायब होतील. ३ ऑक्टोबरला स्टॉकर्स नावाचे अजब प्राणी धरतीवर हल्ला करतील, असा दावा केला गेला आहे.