शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

लग्नाच्या काही दिवसांआधी तरूणाने होणाऱ्या नवरीला दिला दगा, तिच्या छोट्या बहिणीशी केलं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:19 IST

Social Media Post : एका महिलेसोबत असं काही झालं की तिच्या दु:खाचं अंदाज लावता येणार नाही. लग्नाच्या काही दिवसांआधी नवरीच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला दगा दिला आणि तिच्या लहान बहिणीशी लग्न केलं.

Social Media Post : कोणत्याही नात्यात विश्वास हा फार महत्वाचा असतो. विश्वास उडाला की, नात्यात अडचणी निर्माण होणं साहजिक आहे. अनेकदा कपल आपल्या पार्टनरच्या भावनांची कदर करत नाही आणि यामुळे त्यांच्यात अंतर निर्माण होतं. लोक अनेकदा पार्टनरला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढवतात. पण एका महिलेसोबत असं काही झालं की तिच्या दु:खाचं अंदाज लावता येणार नाही. लग्नाच्या काही दिवसांआधी नवरीच्या होणाऱ्या नवऱ्याने तिला दगा दिला आणि तिच्या लहान बहिणीशी लग्न केलं.

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, आपल्या विचित्र पोस्ट्ससाठी प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका दोन मुलींच्या आईने तिच्या मोठ्या मुलीसोबत झालेल्या अजब घटनेचा खुलासा केला.

महिलेने सांगितलं की, तिची मोठी मुलगी लवकरच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत लग्न करणार होती. पण लग्नाच्या काही दिवसांआधी त्या तरूणाने तिला दगा दिला आणि तिच्या लहान बहिणीसोबत त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. या महिलेने सांगितलं की, मोठी मुलगी जेनिफर आधी काही रिलेशनशिपमध्ये होती. ती सतत रिलेशनशिप बदलण्यात विश्वास ठेवणारी होती. मोठ्या मुश्कीलीने तिने एका तरूणासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तिला समजलं की, तिच्या लहान बहिणीचं आणि त्याचं काही वर्षांपासून रिलेशन सुरू आहे. जेनिफरने लगेच लग्न मोडलं.

आईने आधी जेनिफरला समजावण्याचा प्रयत्न केला की, तिने त्या तरूणाला माफ करावं आणि छोट्या बहिणीसोबतचं त्याचं नातं स्वीकारावं. पण जेनिफरने ऐकलं नाही. मग आईने लहान मुलीला समजावलं की, जर तू त्या तरूणासोबत लग्न केलं तर पुढे तो तिलाही दगा देईल. लहान मुलीनेही आईचं ऐकलं नाही आणि लग्नाचा निर्णय घेतला.

तेव्हा आईला इच्छा नसूनही मुलीच्या लग्नात सहभागी होण्यास तयार व्हावं लागलं. पण या गोष्टीने मोठी मुलगी जेनिफर खूप रागावली. वडिलांनीही स्पष्ट केलं होतं की, ते अशा व्यक्तीच्या लग्नात येणार नाही. मोठ्या मुलीनेही आईला सांगितलं की, जर तू लग्नात गेलीस तर ती तिच्यासोबत कधीच बोलणार नाही.

पोस्टमध्ये महिलेने लिहिलं की, ती फारच अडचणीत आहे. ती तिच्या मोठ्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करत आहे की, लग्नात न आल्याने काही बदलणार नाही. तिने परिस्थितीचा स्वीकार करावा लागेल आणि मग पुढे जावं लागेल. सोशल मीडियावरील लोकांनी या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी आईलाच दोष भेदभावाचा आरोप लावला.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया