२८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर 'या' व्यक्तीने केलं असं काही, लोक झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 15:47 IST2021-06-08T15:42:46+5:302021-06-08T15:47:59+5:30

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअऱ केला आहे.

Man became 37th time bridegroom in front of 28 wives, 135 children, 126 grandchildren video viral | २८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर 'या' व्यक्तीने केलं असं काही, लोक झाले हैराण

२८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर 'या' व्यक्तीने केलं असं काही, लोक झाले हैराण

तुम्ही अनेकदा राजा-महाराजांच्या कथांमध्ये ऐकलं असेल की, एका व्यक्तीच्या ३० ते ४० बायका असायच्या. त्या बायकांकडून त्यांना शेकडो लेकरे असायची. हे जुन्या काळात चालत होतं. पण जर २१ व्या शतकात प्रत्यक्षात कुणाला २८ बायका असतील, आणि तरी त्याने ३७ वं लग्न केलं तर तुम्ही काय म्हणाल? इतकंच नाही तर या लग्नात पूर्ण खानदानातील लोक आले तर...असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअऱ केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, '२८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर ३७व्या वेळा हा व्यक्ती लग्न केलंय. त्याच्या ३६ पैकी २८ बायका जिवंत आहेत आणि त्या सर्व एकत्र राहतात. (हे पण बघा : लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल)

काही लोकांचं एक लग्न होत नाही आणि कुणाचं झालं तर त्यांच्यात अडचणी निर्माण होतात. अशात एकत्र २९ बायका असणारा हा माणूस पाहून लोक हैराण झाले आहेत. लोकांच्या मनात त्या बायका कशा राहत असतील? असा प्रश्न पडला आहे. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत आहेत आणि प्रश्नही विचारत आहे. 
 

Web Title: Man became 37th time bridegroom in front of 28 wives, 135 children, 126 grandchildren video viral