कॅन्सरवर उपचारासाठीही नव्हते त्याच्याकडे पैसे, अचानक 'त्या' 'चमत्काराने' झाला कोट्यधीश अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 03:14 PM2019-10-30T15:14:45+5:302019-10-30T15:19:32+5:30

कॅन्सर एक फारच घातक आजार असून या आजारावर उपचार करण्यासाठी भरमसाठ पैसाही लागतो.

Man battling cancer wins lottery on his last day of chemotherapy | कॅन्सरवर उपचारासाठीही नव्हते त्याच्याकडे पैसे, अचानक 'त्या' 'चमत्काराने' झाला कोट्यधीश अन्... 

कॅन्सरवर उपचारासाठीही नव्हते त्याच्याकडे पैसे, अचानक 'त्या' 'चमत्काराने' झाला कोट्यधीश अन्... 

Next

कॅन्सर एक फारच घातक आजार असून या आजारावर उपचार करण्यासाठी भरमसाठ पैसाही लागतो. पण लोक जगण्याच्या आशेने जेवढा शक्य होईल, तेवढा खर्च करतात. काही लोक उपचारासाठी आयुष्यभराची कमाई खर्च करतात. तर काही लोकांना पैशांच्या अभावी उपचार घेणंही शक्य होत नाही. पण अमेरिकेतून एक अशी बातमी समोर आली, जी एका चमत्कारापेक्षा कमी वाटत नाही. 

अमेरिकेच्या उत्तर कॅरोलीनामध्ये राहणाऱ्या रॉनी फोस्टरला कॅन्सरवर उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. रॉनीला पोटाचा कॅन्सर होता, ज्यासाठी त्याला कीमोथेरपी  करायची होती. मात्र, पैशांच्या अभावामुळे रॉनी उपचार घेऊ शकत नव्हता. रॉनीकडे फार कमी रक्कम होती. काही पैशांची त्यांना कमतरता होती.

रॉनी एक दिवस असेच बेउलाविलेच्या एका स्टोरमध्ये थांबला. इथे रॉनीने विन इट ऑल स्क्रॅच ऑफ तिकीट लॉटरी दिसली. ही लॉटरी त्यांनी खरेदी केली. एक डॉलरच्या या लॉटरीवर रॉनीने पाच डॉलर जिंकले. त्यानंतर रॉनीने नशीब आजमावण्यासाठी पुन्हा दोन लॉटरी तिकीट खरेदी केलेत.

रॉनीला पहिल्या तिकीटात काहीच मिळालं नाही. पण दुसऱ्या तिकीटाला स्क्रॅच केल्यावर त्याला भरपूर शून्य दिसले. रॉनी हे बघून हैराण झाला आणि काऊंटवर गेला. काऊंटरवरील व्यक्तीने रॉनीला सांगितले की, तुम्ही फार मोठी रक्कम जिंकले आहात. लगेच लॉटरीच्या मुख्यालयात जा. रॉनी जेव्हा लॉटरीच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांना कळाले की, त्याने दोन लाख डॉलरची लॉटरी लागली आहे. सर्व प्रकारचे टॅक्स कापून रॉनीला १ लाख डॉलर रूपये मिळाले.

गेल्या वर्षी सुरू झालेली ही लॉटरी यावर्षी १ नोव्हेंबरला संपणार आहे. रॉनीला या लॉटरीचं सर्वात मोठा आणि शेवटचं बक्षिस मिळालं आहे. रॉनी हे परिवहन विभागातील निवृत्त कर्मचारी आहेत. जानेवारीमध्ये त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली. रॉनी म्हणाले की, ते आता सहजपणे कॅन्सरवर उपचार घेऊ शकतील आणि सर्वच खर्च उचलू शकतील. त्यानंतर जे पैसे शिल्लक राहतील ते भविष्यासाठी ठेवतील.


Web Title: Man battling cancer wins lottery on his last day of chemotherapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.