Video - हद्दच झाली! 'त्याने' चक्क मेट्रोमध्ये आंघोळ केली; प्रवाशांनी रोखताच त्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:22 IST2022-08-30T13:11:13+5:302022-08-30T13:22:50+5:30

Video - एका व्यक्तीने चक्क मेट्रोमध्ये आंघोळ केल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा मेट्रोमधील इतर प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने प्रवाशांसोबत मारामारीच केली.

man bathing inside metro train watch viral video | Video - हद्दच झाली! 'त्याने' चक्क मेट्रोमध्ये आंघोळ केली; प्रवाशांनी रोखताच त्यांना मारहाण

Video - हद्दच झाली! 'त्याने' चक्क मेट्रोमध्ये आंघोळ केली; प्रवाशांनी रोखताच त्यांना मारहाण

जगभरात अनेक अजब-गजब घटना या घडत असतात. याचे काही हटके व्हिडीओ हे सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. अशीच एक घटना आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. एका व्यक्तीने चक्क मेट्रोमध्ये आंघोळ केल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा मेट्रोमधील इतर प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने प्रवाशांसोबत मारामारीच केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क बाथटब घेऊन मेट्रोमध्ये शिरतो. मग त्याने कपडे काढले अन् सर्वांसमोरच आंघोळ करायला लागला. हा प्रकार पाहून मेट्रोमधील इतर प्रवाशी संतापले अन् त्यांनी आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर जाण्याऐवजी तो चक्क प्रवाशांना मारहाण करू लागला. शेवटी सर्व प्रवाशी मिळून त्याला रोखतात आणि पोलिसांच्या हवाली करतात. 

हा व्हिडीओ @dailyinstavids या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी तो आतापर्यंत पाहिला आहे.  या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्यक्तीला बाथटब घेऊन मेट्रोमध्ये चढायला दिलं कसं?, रोखलं कसं नाही? असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. तर काहींनी ही मुद्दाम केल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: man bathing inside metro train watch viral video