शेवटी बायकोच ती! गोरीला महिलेचे केस ओढत होता, गोरीला मादीनं ‘अशी’ घडवली चांगलीच अद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 16:40 IST2025-07-16T16:27:19+5:302025-07-16T16:40:32+5:30
Gorilla Cute Fight Video : जंगलामध्ये एक महिला पर्यटक दिसत आहे. महिलेच्या समोर एक गोरीला असून तो महिलेचे केस खेचत आहे आणि मग...

शेवटी बायकोच ती! गोरीला महिलेचे केस ओढत होता, गोरीला मादीनं ‘अशी’ घडवली चांगलीच अद्दल
Gorilla Cute Fight Video : कोणत्याही महिलेचा पती जर तिच्यासमोरच एखाद्या दुसऱ्या महिलेची छेड काढत असेल तर विचार करा काय होईल...नक्कीच नवऱ्याच्या कानशीलात बसेल ना...? पण हेच एखादा प्राणी करू शकतो, यावर सहजपणे कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण असं झालंय. अशा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल झाला आहे. एक गोरीला एका महिला पर्यटकाचे केस पकडून मस्ती करत आहे. तेव्हाच त्याला बघून तिथे गोरीला मादी येते आणि संतापलेल्या पत्नीसारखी गोरीलाच्या कानशिलात लगावते. हा व्हिडीओ बघून लोक हसून हसून लोटपोट झाले आहेत.
या भन्नाट व्हिडिओच्या सुरूवातीलाच आपण बघू शकता की, युगांडाच्या जंगलामध्ये एक महिला पर्यटक दिसत आहे. महिलेच्या समोर एक गोरीला असून तो महिलेचे केस खेचत आहे. त्यामुळे महिला जरा घाबरलेली आहे. तेव्हाच एक गोरीला मादी कोलंटउड्या मारत तिथे नर गोरीलाजवळ फिल्मी स्टाईल एन्ट्री घेते. ती मादी गोरीला चांगलीच संतापलेली दिसते. पुढच्या काही क्षणातच गोरीला मादी नर गोरीलाच्या कानशिलात लगावते.
गोरीला मादी केवळ कानशीलात मारत नाही तर नर गोरीलाला खेचत महिलेपासून दूर घेऊन जाते. जणू ती म्हणत आहे की, तू मला सोडून त्या महिलेची का छेड काढत आहे? हा सगळा नजारा इतका मजेदार होता की, महिला पर्यटक आपलं हसू आवरू शकली नाही.
हा व्हिडीओ आधी @mountain_gorillas_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला होता. जो युगांडातील माउंटेन गोरीला कम्युनिटीशी जुळलेला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ १ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. सोशल मीडिया यूजर्सही या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.
कुणी याला पत्नीसारखं वागणं म्हटलं, तर कुणी लिहिलं की, ती म्हणाली असेल, लोकांसमोर माझी लाज काढू नको. एकानं लिहिलं की, या पत्नीची एन्ट्री तर सिनेमातील एखाद्या क्लायमॅक्ससारखीच आहे. या व्हिडिओतून हेही समोर आलं की, मनुष्य आणि प्राण्यांच्या काही बऱ्याच भावना जुळतात.