नवी दिल्ली : आपण माकडांना एका छतावरून दुसऱ्या छतावर उड्या मारताना पाहिले असेल. काही धीट माकडे लोकांच्या हातातील वस्तू ओढून पळ काढतानाही दिसली असतील; पण माणसांप्रमाणे दाढी करणारे माकड आपण कधी पाहिले आहे का? सध्या समाजमाध्यमांवर अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात लाल रंगाचा टी शर्ट, छान पँट आणि पायात कार्टून कॅरॅक्टरचे बूट घातलेले एक माकड इलेक्ट्रिक शेव्हरने दाढी करताना दिसून येते. इन्स्ट्राग्रामच्या बॅड अॅस आॅफिशिअल पेजवर बुधवारी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. अर्थातच व्हिडिओत दिसणारे माकड पाळीव आहे. एक व्यक्ती बाथरूममध्ये त्याची दाढी करीत आहे. हे माकडही उभे राहून आरामात दाढी करून घेत आहे. या माकडाची हेअर स्टाईलही एकदम वेगळी आहे. त्याच्या केसांना छान मिलिट्री कट करण्यात आला आहे. तो त्याला सुंदर दिसत आहे. या व्हिडिओला अवघ्या सहा तासांत ३.१५ लाख लोकांनी पाहिले. त्यावर १,२00 पेक्षा जास्त प्रतिक्रियाही आल्या होत्या.
हे माकड करते इलेक्ट्रिक शेव्हरने दाढी
By admin | Updated: May 28, 2017 04:19 IST