Elon Musk नंदेखील पाहिली नसेल अशी टेस्ला! Anand Mahindra यांनी शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 23:01 IST2022-04-24T23:00:18+5:302022-04-24T23:01:11+5:30
आनंद महिंद्रांनी मस्क यांना केलं टॅग.

Elon Musk नंदेखील पाहिली नसेल अशी टेस्ला! Anand Mahindra यांनी शेअर केला फोटो
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) ट्विटरवर अतिशय अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपले विचार ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. त्यांनी असाच एक फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना त्यात ट्वीट केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक बैलगाडीचं पेंटिंग ट्वीट केलं आहे. तसंच त्यांनी त्या फोटोसोबत मस्त यांना टॅग केलं आहे. ‘BACK to the Future…’ असं कॅप्शन दिलं आहे. “हे आहे ओरिजनल टेस्ला व्हेइकल, ना गुगल मॅपची गरज, ना इंधनाची, कोणतंही प्रदुषण नाही, पूर्णपणे आपहून चालणारी कार, बस घरी जाण्यासाठी आणि ऑफिसला येण्यासाठी सेटिंग सेट करा. आराम करा, झोप काढा आणि आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचा,” असंही त्यांनी फोटोखाली लिहिलं आहे.
BACK to the Future… @elonmusk pic.twitter.com/csuzuF6m4t
— anand mahindra (@anandmahindra) April 24, 2022
आनंद महिंद्रा यांचं हे ट्वीट अतिशय व्हायरल झालं आहे. या ट्वीटवर अनेकांचं लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.