Anand Mahindra : १० वर्षांची मेहनत, विकत घेतली एसयुव्ही; आनंद महिंद्रांनी अभिनंदन करत केली हृदय जिंकणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:41 IST2022-08-03T15:40:05+5:302022-08-03T15:41:45+5:30
10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अशोककुमार यांनी त्यांची ड्रीम कार महिंद्रा XUV700 विकत घेतली. त्यांनी त्याचे फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवरही शेअर केले.

Anand Mahindra : १० वर्षांची मेहनत, विकत घेतली एसयुव्ही; आनंद महिंद्रांनी अभिनंदन करत केली हृदय जिंकणारी गोष्ट
आपल्या कष्टाच्या पैशाने आपली स्वप्ने पूर्ण करण्याच्या भावनेपेक्षा मोठं दुसरं काहीही नाही. आपली ड्रीम कार खरेदी करणे, आपलं स्वप्नातील घर खरेदी करणे, आपली स्वप्ने पूर्ण करणं यापेक्षा दुसरं काही मोठं नाही. अशोककुमार यांनी १० वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांची ड्रीम कार महिंद्रा XUV700 खरेदी केली आणि ३१ जुलै रोजी ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्ससोबत ही बातमी शेअर केली. त्यांनी आनंद महिंद्रा यांचे आशीर्वादही मागितले आणि त्यांच्या नवीन कारसह स्वतःचा एक फोटो शेअर केला. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आणि त्यांच्या उत्तरानं सर्व नेटकऱ्यांची मनंही जिंकली.
अनेकांनी अशोककुमार यांचं अभिनंदन केलं. यामध्ये आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. “धन्यवाद, पण तुम्हीच आम्हांला तुमच्या निवडीद्वारे आशीर्वाद दिलात. मेहनतीमुळे मिळालेल्या यशाबद्दल तुमचे अभिनंदन. हॅपी मोटरिंग,” असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं. अशोककुमार यांनी गाडीसह आपला फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांच्याकडे आशीर्वाद मागितले होते.
@anandmahindra After 10 years hard work buy new Mahindra #XUV700 need ur blessing sir..😍 pic.twitter.com/tdXiBqajK4
— C Ashokkumar (@itsakdmk) July 31, 2022
आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असतात. तसंच त्यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्या फॉलोअर्सना उत्तर दिलं आहे. ते सातत्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहितीही शेअर करत असतात.