भारतीय तरूणाचा चेहऱ्यावर सगळ्यात जास्त केस असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण इतके केस कसे आलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:32 IST2025-03-08T14:32:16+5:302025-03-08T14:32:56+5:30

Werewolf Syndrome: मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरूणाच्या चेहऱ्या इतके केस आहेत की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

Madhya Pradesh boy with werewolf syndrome sets Guinness world record | भारतीय तरूणाचा चेहऱ्यावर सगळ्यात जास्त केस असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण इतके केस कसे आलेत?

भारतीय तरूणाचा चेहऱ्यावर सगळ्यात जास्त केस असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, पण इतके केस कसे आलेत?

Werewolf Syndrome : माकड, अस्वल असे प्राणी पाहिले तर यांच्या पूर्ण शरीरावर दाट केस असतात. मनुष्यांच्या डोक्यावर सगळ्यात जास्त केस असतात. बाकी शरीरावर कमीच असतात. मात्र, मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात राहणाऱ्या एका १८ वर्षीय तरूणाच्या चेहऱ्या इतके केस आहेत की, त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. सहाजिक आहे की, कुणालाही हा प्रश्न पडेल की, त्याच्या चेहऱ्यावर इतके केस कसे आलेत? चला तर जाणून घेऊ.

ललित पाटीदार असं या तरूणाचं नाव असून तो हायपरट्रिकोसिस (Hypertrichosis) नावाच्या एका दुर्मीळ आजारानं पीडित आहे. या आजाराला वेअरवोल्फ सिंड्रोम असंही म्हटलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे या दुर्मीळ आजारानं जगभरात सध्या केवळ ५० लोक पीडित आहेत. या रूग्णांच्या चेहऱ्यावर सामान्य लोकांच्या तुलनेत खूप जास्त केस येतात. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार,  ललितचा ९५ टक्के चेहरा केसांमुळे झाकला गेला आहे. केसांमुळे त्याच्या चेहऱ्यावरील डोळे, नाक, कान, ओठ काहीच दिसत नाही.

ललितनं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला सांगितलं की, "जे लोक मला पहिल्यांदा बघतात, ते माझा चेहऱ्या बघून घाबरतात. पण जेव्हा लोक माझ्याशी बोलतात आणि माझ्याबद्दल जाणून घेतात तेव्हा त्यांना मी सुद्धा त्यांच्यासारखा सामान्य असल्याचं समजतं. माझा स्वभाव सामान्य लोकांसारखाच आहे".

ललित लोकांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही. त्याला हे माहीत आहे की, त्याचा चेहरा सामान्य नसला तरी ही त्याची एक वेगळी ओळख आहे. जी स्वीकारली पाहिजे. ललित एक यूट्यूब चॅनल चालवतो, ज्यावर तो डेली रूटीन सांगतो. 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याआधी ललित इटलीच्या मिलान शहरात एका टीव्ही शोमध्ये दिसला होता. इथे रेकॉर्ड बनवण्याआधी त्यांच्या केसांची मोजमाफ घेण्यात आलं होतं. 

वर्ल्ड रेकॉर्ड नावावर झाल्यावर ललित म्हणाला की, 'मला फार आनंद झाला आहे. मला माहीत नाही की, मी काय बोलून. कारण ही ओळख मिळाल्यानं मी आनंदी आहे. ज्यांना वाटतं की, मी माझ्या चेहऱ्यावरील केस शेविंग करून काढले पाहिजे, तर त्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मला माझं हे रूप आवडतं. कुणासाठी मी माझं रूप बदलू शकत नाही.

Web Title: Madhya Pradesh boy with werewolf syndrome sets Guinness world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.