This luxury travel company will pay you 1.84 lakhs per week to stay in luxury homes | नोकरीची धमाकेदार संधी; ही कंपनी तुम्हाला आठवड्याला देणार १.८४ लाख रूपये, जाणून घ्या काम!
नोकरीची धमाकेदार संधी; ही कंपनी तुम्हाला आठवड्याला देणार १.८४ लाख रूपये, जाणून घ्या काम!

(Image Credit : careeraddict.com)

शॉपिंग करणं, फिरायला जाणं, लग्झरी हॉटेल्समध्ये राहणं हे प्रत्येकालाच आवडतं. चांगला पगार मिळाल्यावर अनेकजण याच गोष्टी करतात. पण जरा विचार करा की, या गोष्टी करण्यासाठीच जर तुम्हाला एखाद्या कंपनीने कामावर ठेवलं तर? इतकंच नाही तर आठवड्याला तुम्हाला १.८४ लाख रूपये देतील तर? लगेच अशा नोकरीला होकार द्याल ना? मग तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे.

नक्कीच ही नोकरी ड्रीम जॉबपेक्षा कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, hushhush.com ही लक्झरी ट्रॅव्हल कंपनीत नोकरीची संधी आहे. ही कंपनी ट्रॅव्हल आणि प्रॉपर्टी डील्स क्षेत्रात काम करते. आता या कंपनीला ५ ते १० लोकांची गरज आहे. जे जगभरातील घरांमध्ये एक आठवडा वेळ घालवतील आणि त्यांचे रिव्ह्यू करतील. बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, एक होम टेस्टरला दरवर्षी १० ते १५ अशा लक्झरी प्रॉपर्टीमध्ये थांबण्याची आणि त्यांचे रिव्ह्यू करण्याची संधी मिळेल.

स्पेन, प्लोरिडा, सन फ्रॅन्सिको फिरण्याची संधी

कंपनीच्या वेबसाइटवर ज्या लक्झरी प्रॉपर्टीचा उल्लेख केला आहे, त्यात स्पेनमधील एक २५ रूमचा व्हिला, फ्लोरिडातील ओशन रीफ क्लब आणि सेन फ्रॅन्सिस्कोमधील १४००० स्क्वेअर फूटाच्या मेन्शनचा समावेश आहे. आता राहिला प्रश्न हा की, यासाठी पात्रता काय असेल? 

या असतील अटी

कंपनीत नोकरी करण्याच्या पात्रतेचाही उल्लेख करण्यात आला आहे. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवाराचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड असू नये. पासपोर्ट अप-टू-डेट असावा. प्रत्येक गोष्ट बारकाईने बघणे आणि ते चांगल्याने लिहिण्याचं कौशल्य असावं. कमी वेळात जास्त कामाचं कौशल्य असावं. त्यामुळे तुम्ही जर ट्रॅव्हल ब्लॉगर असाल आणि नेहमी रिव्ह्यू लिहित असाल तर ही नोकरी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.


Web Title: This luxury travel company will pay you 1.84 lakhs per week to stay in luxury homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.