शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लाकडापासून तयार केलेली 100 वर्षे जुनी सायकल, 50 लाखांची लागली होती बोली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 9:32 AM

100 year old bicycle is made of wood : भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी लाकूड आणि लोखंडापासून बनवलेली ही एक अनोखी सायकल आहे, जी सुमारे 100 वर्षे जुनी आहे.

लुधियाणा : गियर सायकल, रेसर सायकल, घरगुती सायकल असे सायकलचे अनेक प्रकार आतापर्यंत लोकांनी पाहिले आहेत. पण लाकडी सायकल ती सुद्धा 100 वर्षे जुनी. हे वाचून आश्चर्यकारक वाटत असेल. विशेष बाब म्हणजे तेव्हाही सायकलिंगसाठी सरकारी परवानगी घ्यावी लागली होती आणि त्या सायकलचा परवाना बनवण्यात आला होता. (ludhiana 100 year old bicycle is made of wood bid 50 lakh rupees)

भारत-पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी लाकूड आणि लोखंडापासून बनवलेली ही एक अनोखी सायकल आहे, जी सुमारे 100 वर्षे जुनी आहे. ही पाहणे म्हणजे एकप्रकारे आश्चर्यकारक आहे. कदाचित पंजाबमध्येच अशी एक सायकल असेल, तिला पाहण्यासाठी लोक लांबून येतात. ही अनोखी सायकल खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीने 50 लाख रुपयांची बोली केली होती. मात्र, या सायकल मालकाने ती विकले नाही.

सायकलचे मालक सतविंदर यांनी सांगितले की,  ही सायकल त्यांच्या वडिलांनी जवळच्या गावात राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याकडून खरेदी केली होती. त्या वेळी सायकल चालवण्यासाठी परवानाही बनवण्यात आला होता, जो सध्या त्यांच्याकडे आहे. हा परवाना त्याच्या काकांच्या नावे होता. ज्यावेळी लोक सायकल पाहण्यासाठी येतात, त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे ही सायकल अजूनही चालवता येते.

याचबरोबर, ही सायकल खरेदी करण्यासाठी परदेशातून एक व्यक्ती आली होती. या व्यक्तीने सायकल विकत घेण्यासाठी तिची किंमत 50 लाख रुपये ठरवली होती. पण आम्ही सायकल विकली नाही, कारण छंदाला किंमत नसते, असे सायकलचे मालक सतविंदर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे वृत्त हिंदी वेबसाइट 'आजतक'ने दिले आहे.

टॅग्स :PunjabपंजाबJara hatkeजरा हटके