नशीबवान! "पैसाच पैसा येणार"; टॅरो कार्ड रीडरला भेटून घरी आली अन् रात्री करोडपती झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:26 PM2024-04-19T16:26:17+5:302024-04-19T16:27:14+5:30

एका टॅरो कार्ड रीडरने तिला खूप पैसे मिळतील अशी भविष्यवाणी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री महिला कोट्यवधींची मालकीण बनली.

lucky us woman wins 4 crore same day after tarot reading hints at financial windfall | नशीबवान! "पैसाच पैसा येणार"; टॅरो कार्ड रीडरला भेटून घरी आली अन् रात्री करोडपती झाली

नशीबवान! "पैसाच पैसा येणार"; टॅरो कार्ड रीडरला भेटून घरी आली अन् रात्री करोडपती झाली

नशीब ही अशी गोष्ट आहे की एखाद्याला जमिनीवरून सिंहासनावर बसवते. मिशिगनमधील एका महिलेच्या दाव्यानुसार, तिच्यासोबत जे घडलं ते खूपच हैराण करणारं आहे. महिलेचा दावा आहे की, एका टॅरो कार्ड रीडरने तिला खूप पैसे मिळतील अशी भविष्यवाणी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच रात्री महिला कोट्यवधींची मालकीण बनली.

59 वर्षीय महिलेने खुलासा केला की, एके दिवशी ती टॅरो कार्ड सेशनसाठी जात असताना तिने चुकून बीपी गॅस स्टेशनवर स्क्रॅच ऑफ तिकीट विकत घेतलं. तिने सांगितलं - जेव्हा मी टॅरो कार्ड रीडरकडे गेले तेव्हा तिने भाकीत केलं की मला खूप पैसे मिळतील... ते पूर्ण झालं आणि मी तिकिटाचा विचारही केला नाही. रात्री काही छोटी लॉटरी जिंकण्याच्या आशेने मी तिकीट स्क्रॅच केलं, पण मला मिळालेले बक्षीस माझं आयुष्य बदलून टाकणार होतं.

एकूण 4 कोटी 18 लाख रुपयांचं बक्षीस असल्याचं त्यांनी सांगितलं. महिलेने सांगितलं की, ती तिच्या कारचा ईएमआय याद्वारे भरणार आहे आणि मित्रासोबत क्रूझवर जाण्याचा आणि उर्वरित पैसे गुंतवण्याचा विचार करत आहे.
 
महिलेने मिशिगन लॉटरी अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी माझ्या आयुष्यात लोकांना नेहमी सांगितलं होतं की, मी एक दिवस लॉटरी जिंकणार आहे. आठवड्यातून एकदा, मी गेम खरेदी करते आणि मी ते नेहमी त्याच दुकानातून खरेदी करते. पण, ज्या दिवशी मी जिंकले, त्या दिवशी मी टॅरो रिडिंगसाठी जात होते, म्हणून मी वेगळ्या दुकानात थांबले. 

टॅरो रिडिंगदरम्यान, मला सांगण्यात आलं की माझ्या आयुष्यात लवकरच पैसा येणार आहे. हे कसं घडू शकतं याचा मी विचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या पर्समधील लॉटरीच्या तिकिटाचा मी तेव्हा अजिबात विचार केला नाही.
 

Web Title: lucky us woman wins 4 crore same day after tarot reading hints at financial windfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.