Lord Shiva : महाशिवरात्रीला भारतातील सगळ्याच राज्यांमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. भगवान शिवाची पूजा करून त्यांची आराधना केली जाते. मात्र, महाशिवरात्री केवळ भारतातच नाही तर इतरही काही देशांमध्ये साजरी केली जाते. जपानसारख्या देशातही भगवान शिवाजी पूजा केली जाते. जपानमध्ये भगवान शिवाची पूजा गॉड ऑफ फॉर्च्यूनच्या रूपात केली जाते.
आपल्याकडे भगवान शिवाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. जपानमध्ये भगवान शिवाला दायक कुटेन (Daikokuten) म्हटलं जातं. याचा अर्थ होतो की, ब्लॅक ग्रेट देव. जपानी लोक शंकरजीच्या महाकाल रूपानं प्रभावित असल्याचं सांगण्यात येतं. जपानमध्ये दायक कुटेनची पूजा धनलाभ होण्यासाठी केली जाते. असं मानलं जातं की, त्यांची पूजा केल्यानं कधी पैशाची कमतरता होत नाही. त्यामुळे दायक कुटेनच्या हातात पैसे दिसतात.
जपानमध्ये केवळ भगवान शिवाचीच नाही तर अनेक हिंदू देवी-देवतांची पूजा केली जाते. शेकडो वर्षांआधीपासून जपानमध्ये हिंदू धर्माच्या खुणा दिसतात. इथे अनेक मंदिरं आहेत. बुद्धगयाला आलेले अनेक लोक त्यांच्यासोबत हिंदू देवतांची आस्था सोबत घेऊन गेले. त्यामुळे जपानमध्ये ब्रम्ह, गणेश, माता सरस्वतीसोबतच इतरही अनेक हिंदू देवतांची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला इथे दायक कुटेन म्हणजे नेपाळी शिवाची पूजा केली जाते.
जपानमध्ये सगळ्या हिंदू देवी-देवतांची नावं वेगळी आहेत. त्यांची रूपंही वेगळी आहेत. भारतात देवांची जी रूपं तुमच्या डोक्यात फिक्स आहेत, जपानमध्ये तशी नाहीत. इथे रूपं वेगळी आहेत. भगवान श्रीकृष्णाकडे बासरी आपण बघतो, तसेच भगवान गणेशाला सोंड दिसते. पण जपानमध्ये या देवांमध्ये तुम्हाला बुद्धाची झलक बघायला मिळते.