शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

१५ वयाची असून 'ती' दिसत होती ६० वयाची, विद्यार्थ्यांच्या टोमण्यांना कंटाळून केली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 10:56 AM

सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी कितीतरी अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. अनेक सर्वसामान्य महिलाही प्लास्टिक सर्जरी करतात. पण प्लास्टिक सर्जरीची एक अनोखी घटना समोर आली आहे.

(Image Credit : dailymail.co.uk)

सुंदर आणि तरूण दिसण्यासाठी कितीतरी अभिनेत्रींनी प्लास्टिक सर्जरी केली. अनेक सर्वसामान्य महिलाही प्लास्टिक सर्जरी करतात. पण प्लास्टिक सर्जरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. चीनच्या लियोनिंग शहरात एका मुलीने लोकांच्या टोमण्यांमुळे प्लास्टिक सर्जरी केल्याची घटना घडली आहे.

१५ वर्षीय जियाओफेंग तिच्या वयाच्या मुलींच्या तुलनेत चार पटीने अधिक जास्त मोठी दिसत होती. त्यामुळे शाळेत तिला विद्यार्थी चिडवत असत. जियाओफेंगची ही स्थिती तिला असलेल्या प्रोजेरिया आजारामुळे झाली होती. प्रोजेरिया हा एका दुर्मीळ प्रोग्रेसिव्ह जेनेटिक डिसऑर्डर आहे. ज्यात लहान मुलांचं वय वेगाने वाढू लागतं. हा तोच आजार आहे ज्यावर 'पा' सिनेमा आधारित होता.

या आजाराने पीडित जास्तीत जास्त १२ वर्षे जगतात

सरासरी प्रोजेरियाने पीडित लहान मुले १२ वर्षेच जगतात. पण अनेकदा काही मुले २० वयापर्यंतही जगतात. जियाओफेंगला जेव्हा हा आजार झाला तेव्हा याचा प्रभाव केवळ तिच्या चेहऱ्यावरच दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर वयोवृद्धांसारख्या सुरकुत्या आल्या होत्या. त्यामुळेच तिने सर्जरी करून चेहऱ्यावरील एक्स्ट्रा फॅट काढलं.

जियाओफेंगच्या वडिलांनी सांगितले की, एक वर्षाची झाली होती तेव्हा जियाओफेंगच्या चेहऱ्या या आजाराचा प्रभाव दिसू लागला होता. वय वाढण्यासोबत चेहऱ्यावरील सुरकुत्याही वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ती म्हातारी दिसत होती. शाळेत तिला आज्जी म्हणून चिडवत होते. अखेर तिने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक संस्थापर्यंत तिची माहिती पोहोचली. त्यांनीच या सर्जरीसाठी पैसा जमा केला.गेल्या महिन्यात तिचं ऑपरेशन झालं. जियाओफेंगचे डॉक्टर शी लिंग्जी यांनी सांगितले की, त्यांनी सर्जरी करून ७ सेमी त्वचा तिच्या चेहऱ्याहून काढली. त्यासोबतच तिच्या नाकाजवळची आणि तोंडाजवळची त्वचाही व्यवस्थित केली.

जियाओफेंग म्हणाली की, सर्जरीआधी मला अनेकजण आंटी आणि आज्जी म्हणत होते. पण मी काही बोलले नाही. पण आता सर्जरी केल्यावर मी शाळेत गेल्यावर मला कुणी सुंदर म्हणू नये असं मला वाटतं. त्यांनी मला इतर टीनएजर्ससारखं स्वीकारावं.

टॅग्स :chinaचीनJara hatkeजरा हटके