बॉयफ्रेंडच्या आजोबांमुळेच गरोदर राहिली तरुणी, व्हिडीओतून केला त्याने धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 15:42 IST2021-06-21T15:39:34+5:302021-06-21T15:42:47+5:30

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, यूकेच्या लंडनमधील ही घटना आहे. हा टिकटॉक यूजर आतापर्यंत ज्याला आपलं अपत्य समजत होता, तो नात्यानं त्याचा चुलता लागतो.

London man finds that his girlfriend is in sexual relationship with his grandfather | बॉयफ्रेंडच्या आजोबांमुळेच गरोदर राहिली तरुणी, व्हिडीओतून केला त्याने धक्कादायक खुलासा

बॉयफ्रेंडच्या आजोबांमुळेच गरोदर राहिली तरुणी, व्हिडीओतून केला त्याने धक्कादायक खुलासा

एका टिकटॉक यूजरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने त्याच्यासोबत घडलेल्या अशा घटनेबाबत सांगितलं ज्याबाबत जाणून घेतल्यावर लोकही हैराण झाले आहेत. या व्यक्तीने असा खुलासा केला की, अनेक वर्षांनी त्याला असं समजलं की, तो ज्याला आपला मुलगा समजत होता, तो त्याचा मुलगा नसून चुलता आहे. तो म्हणाला की, तो अजून या धक्क्यातून सावरलेला नाहीये. कारण, त्याला असं समजलं आहे, की त्याच्या गर्लफ्रेंडला झालेलं मुल हे त्याचं नसून त्याच्या आजोबांचं आहे.

'द सन'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, यूकेच्या लंडनमधील ही घटना आहे. हा टिकटॉक यूजर आतापर्यंत ज्याला आपलं अपत्य समजत होता, तो नात्यानं त्याचा चुलता लागतो. याची जेव्हा स्टॉक्स नावाच्या या ट्विटर यूजरला माहिती मिळाली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. (हे पण वाचा : तरूणीने मेसेजमध्ये चुकून Conditioner च्या जागी लिहिलं Condom, वडिलांनी पाहिला मेसेज आणि मग...)

त्यानं सांगितलं की, माझ्या गर्लफ्रेंडनं मला दगा दिला आहे. आम्ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. आम्ही माझ्या घरीच राहत होतो. तेव्हा तिनं माझ्याच आजोबांसोबत शारीरिक संबंध ठेवले. माझ्याच घरात राहून तिने मला असा दगा दिला. माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, की ती माझ्यासोबत असं काही करेल. माझ्या आजोबांनीही स्वतःच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. ते माझे आजोबा असल्यानं मला कधीही त्यांच्यावर संशय आला नाही.

स्टॉक्स नावाच्या या टिकटॉक यूजरनं एका व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत खुलासा केला. हा व्हिडिओ सध्या टिकटॉकवर चर्चेचा विषय ठरत आहे. स्टॉक्सला अनेकांकडून सहानुभूती मिळत आहे. एकाने कमेंट केली की, 'तुझ्याबद्दल ऐकून अत्यंत दुःख झालं. मला माहिती आहे, तुला खूप वाईट वाटत असेल. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी स्वतःला थोडा वेळ दे. तुझ्यासाठी जगात दुसरं कोणीतरी नक्की बनलं असेल'. 
 

Web Title: London man finds that his girlfriend is in sexual relationship with his grandfather