सिंहाने केअर टेकरवर पाठीमागून मारली झडप अन्; पाहा थरारक video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 21:45 IST2021-12-20T21:45:07+5:302021-12-20T21:45:15+5:30
सोशल मीडियावर सिंहाचा झडप मारतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सिंहाने केअर टेकरवर पाठीमागून मारली झडप अन्; पाहा थरारक video
नवी दिल्ली : वन्य प्राणी विशेषतः सिंह, वाघ आणि बिबट्या त्यांच्या जंगली स्वभावासाठी ओळखले जातात. या प्रचंड आणि धोकादायक प्राण्यांचा केवळ उल्लेख केल्यानेही भीती निर्माण होते. पण माणसांप्रमाणेच या प्राण्यांनाही प्रेमाची आस असते हेही वास्तव आहे. पाळीव प्राण्यांप्रमाणे सिंह, वाघ आणि बिबट्याही प्रेमाचे भुकेले असतात. एका व्हायरल व्हिडिओमध्येही हेच पाहायला मिळत आहे.
सिंहाने मारली मिठी
सिंह आणि माणसामधील एक प्रेमळ मैत्री बोत्सवानामधील कलहारी वाळवंटातील अभयारण्यात पाहायला मिळत आहे. या अभयारण्यात राहणाऱ्या प्राण्यांची देखभाल वॅल ग्रुनर नावाचा व्यक्ती करतो. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये व्हॅल ग्रुनरसोबत सिरगा नावाचा मादी सिंह दिसत आहे. व्हिडिओमध्ये, सिरगा वॅल ग्रुनरला मिठी मारताना दिसत आहे. क्लिपच्या सुरुवातीला, सिंह वॅलवर हल्ला करणार असे दिसते, परंतु प्रत्यक्षात ती तिच्या केअरटेकरला मिठी मारत होती.
व्हिडिओला जगभरात पसंती
हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. जगभरातून या व्हिडिओला अनेक लाइक्स आणि शेअर मिळत आहेत. ग्रुनर अनेकदा स्वतःचे आणि सिरगाचे क्लिप आणि फोटो शेअर करत असतो. त्याचे सोशल मीडियावर 78 हजार फॉलोअर्स आहेत.