Knowledge News : आपण रोज कितीतरी जीव बघत असतो, ते आपल्या ओळखीचे असतात. पण तरीही सुद्धा आपल्याला या जीवांबाबत पुरेशी माहिती नसते. काहींमध्ये तर इतकं वेगळेपण असतं, ज्याची आपण कधी कल्पना देखील केलेली नसते. आपल्याला जर विचारलं की, कोणत्या जीवांना कान नसतात? तर लगेच उत्तरं मिळतील. पण जर विचारलं की, कोणत्या जीवाचे कान त्याच्या पायात असतात? तर नक्कीच अनेकांना याचं उत्तर येणार नाही. काहींना वाटेल की, असं कसं होईल? पण असं आहे. एक असा जीव आहे, ज्याला आपण अनेकदा बघितलं असेल, त्याचे कान चेहऱ्यावर किंवा डोक्यावर नाही तर पायांमध्ये असतात? चला तर जाणून घेऊ कोणता आहे हा अनोखा जीव.
कोणत्या जीवाचे कान पायात?
इकडे तिकडे तडातड उड्या मारणारा टोळ हा जीव आपण अनेकदा पाहिला असेल. कधी घराच्या बाल्कनीत तर कधी अंगणात किंवा शेतात तर ते भरपूर दिसतात. नॅशनल जिओग्राफी आणि सायंटिफिक अमेरिकन वेबसाईटनुसार, टोळ या कीटकाचे कान त्यांच्या पायाजवळ असतात. त्यांचे कान गुडघ्याच्या जरा वरच्या बाजूला असतात. टोळांचे कान त्यांच्या समोरच्या पायांमध्ये असतात आणि त्यात चार ध्वनी इनपुट असलेलं एक ध्वनी रिसीव्हर असतं. याद्वारे ते बाहेरचा आवाज ऐकतात. म्हणजे हे कान एंटीनासारखे काम करतात.
टोळांबाबत आणखीही काही खास गोष्टी आहेत. जसे की, टोळ हे नेहमी घोळक्याने म्हणजे ग्रुपने फिरतात आणि ते सगळेच एका दिवसात हजारो वयस्क लोकांचं अन्न संपवू शकतात. तुम्हाला माहीत नसेल, पण आफ्रिका, आशिया आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये लोक टोळ खातात.
टोळ त्यांचे पाय एकमेकांना घासून ध्वनी निर्माण करतात. यांच्याबाबत सगळ्यात आश्चर्यकारक बाब म्हणजे हे जीव २०० मिलियन वर्षांआधीपासून पृथ्वीवर आहेत. फॉसिक रेकॉर्ड सांगतात की, पहिल्यांदा टोळ ३०० मिलियन वर्षाआधी दिसले होते म्हणजे ते पृथ्वीवरील सगळ्यात प्राचीन जीवांपैकी एक आहेत.
कोणत्या जीवांना नसतात कान?
काही असेही जीव असतात, ज्यांना कान नसतात. या जीवांमध्ये साप, कासव, मासे, मुंगी आणि बेडूक यांचा समावेश आहे. साप हे आपला जबडा आणि त्वचेच्या माध्यमातून जमीन किंवा हवेत होणाऱ्या कंपणाला फिल करून ऐकत असतात. अनेक पक्ष्यांना देखील कान नसतात. या जीवांना त्यांच्या अंतर्गत रचनेच्या माध्यमातून आजूबाजूच्या हालचालीची जाणीव होते. बऱ्याच लांब अंतरावरून हे जीव त्यांच्या बाजूने कुणीतरी येत असल्याची माहिती मिळवू शकतात.
Web Summary : Did you know grasshoppers have ears on their legs? These insects use leg-based sound receptors. Other creatures, like snakes, lack external ears, sensing vibrations instead. Discover surprising animal adaptations!
Web Summary : क्या आप जानते हैं कि टिड्डों के पैर में कान होते हैं? ये कीड़े पैर आधारित ध्वनि रिसेप्टर्स का उपयोग करते हैं। सांप जैसे अन्य प्राणियों में बाहरी कान नहीं होते, वे कंपन महसूस करते हैं। आश्चर्यजनक पशु अनुकूलन की खोज करें!