भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:17 IST2021-05-26T14:41:50+5:302021-05-26T15:17:05+5:30
मुळात कोणत्याही नाण्यावर ईअर ऑफ प्रॉडक्शनच्या ठीक खाली दिसणारे हे वेगवेगळे चिन्ह हे दर्शवतात की, ती नाणी देशातील कोणत्या शहरात तयार करण्यात आली आहेत.

भारतीय नाण्यांवर वर्षाच्या खाली डॉट, स्टार अशी चिन्हे का असतात? जाणून घ्या अर्थ.....
भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आपण नोट आणि नाण्यांच्या मदतीने देवाण-घेवाण करतो. गेल्या काही वर्षात देवाण-घेवाण डिजिटल पेमेंट्सनेही होऊ लागली आहे. पण आजही एक असा मोठा वर्ग आहे जो कॅशमध्येच देवाण-घेवाण करणं पसंत करतो.
आपल्या देशात सध्याच्या स्थितीत 2000, 500, 200, 100, 50, 20, 10, 5, 2 आणि 1 रुपयाची नोट चलनात आहे. त्यासोबतच भारतात 1, 2, 5, 10, 20 रूपयांची नाणीही चलनात आहेत. आपण दिवसभर अनेकदा नाण्यांनी देवाण-घेवाण करतो. पण तुम्ही कधी नाण्यांवर असलेल्या खास चिन्हांवर लक्ष दिलं?
नाण्यांवरील निशाण
जर तुमच्याकडे कोणतंही नाणं असेल तर लक्ष देऊन बघा की, त्या नाण्यावर त्याचं प्रॉडक्शन इअर म्हणजे वर्ष लिहिलेलं असतं. त्याच्या ठीक खाली एक 'डॉट', 'स्टार' किंवा 'डायमंड'सारखं निशाण असतं. तुम्हाला माहीत आहे का याचा काय अर्थ होतो? (हे पण वाचा : रोज साबणाने आंघोळ करणाऱ्यांनो देशातील पहिल्या स्वदेशी साबणाबाबत माहीत आहे का?)
मुळात कोणत्याही नाण्यावर ईअर ऑफ प्रॉडक्शनच्या ठीक खाली दिसणारे हे वेगवेगळे चिन्ह हे दर्शवतात की, ती नाणी देशातील कोणत्या शहरात तयार करण्यात आली आहेत. या चिन्हांची ओळख मिंटने केली जाते. मिंटचा अर्थ होतो की, जिथे ही नाणी तयार करण्यात येतात.
भारतात चार शहरात आहे 'मिंट'
भारतात केवळ ४ शहरांमध्ये नाणी तयार करण्याचं काम केलं जातं. या शहरांमध्ये कोलकाता, हैद्राबाद, मुंबई आणि नोएडा यांचा समावेश आहे. कोलकाता मिंट देशातील सर्वात जुनं मिंट आहे. याची स्थापना १७५७ मध्ये झाली होती. मुंबई मिंटची स्थापना १८२९ मध्ये झाली होती. हैद्राबाद मिंटची स्थापना १९०३ मध्ये तर नोएटा मिंटची स्थापना १९८४ मध्ये झाली होती. (हे पण वाचा : ऑपरेशन करताना डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडेच का वापरतात?)
कशी पटवली जाते नाण्यांची ओळख?
कोलकाता मिंटमध्ये तयार करण्यात आलेल्या नाण्यांवर चिन्ह दिलं जात नाही. मुंबई मिंटच्या नाण्यांवर 'डायमंड'सारखा डिझाइन असतं. त्यासोबतच मुंबई मिंटच्या नाण्यांवर B किंवा M असंही लिहिलं जातं. हैद्राबाद मिंटमध्ये तयार करण्यात आलेल्या नाण्यांवर 'स्टार' चिन्ह असतं. तर नोएडामधील मिंटमध्ये तयार केलेल्या नाण्यांवर 'डॉट'चं निशाण असतं.