महिन्याच्या शेवटीही खिसा रिकामा राहू नये असं वाटतं ना? मग या टिप्स वापराच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 02:44 PM2020-01-06T14:44:04+5:302020-01-06T14:49:06+5:30

तुम्ही पैसे कमवत असाल किंवा कमवत नसाल तरी सुध्दा  महिन्याच्या अखेरीस सगळे पैसे संपतात.

know changes that save money | महिन्याच्या शेवटीही खिसा रिकामा राहू नये असं वाटतं ना? मग या टिप्स वापराच

महिन्याच्या शेवटीही खिसा रिकामा राहू नये असं वाटतं ना? मग या टिप्स वापराच

Next

तुम्ही पैसे कमवत असाल किंवा कमवत नसाल  तरी सुध्दा  महिन्याच्या अखेरीस सगळे पैसे संपतात. असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. पगार झाल्यानंतर साधारणपणे १५ दिवस  पैसे व्यवस्थित असतात. पण जसजसा महिना संपायला लागतो तसतसं पैशाची कडकी भासायला सुरूवात होत असते. कधी एकदा महिना संपतोय असं वाटतं असतं. पण काहीजणांच्या बाबतीत असं  होत असतं की  पगार झाल्याझाल्या किंवा पैसे मिळाल्यानंतर लगेच २ ते ३ दिवसात  पैसे संपतात. पण आपण  स्वतः या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे.

कारण लहानपणी जेव्हा आपल्याकडे पैसे नसायचे.  तेव्हा पैसे जमा करणं ही गंमत वाटत होती. पण गमतीने का होईना  काहीतरी डोक्यात ठरवून आपण आपल्या बिगीबॅगमध्ये पैसे जमा करत होतो. त्या दिवसात आपली पैसे जमवण्याची पेटी किंवा डबा  इतक्या जलदगतीने भरायचा आणि आता एवढे पैसे आणि सॅलरी कमवून सुध्दा पैसे मिळत नाहीत. 

सध्याच्या काळात आपण स्वतःसाठी न जगता बाकी सगळ्यासांठीत जगत असतो. कारण  लोक काय म्हणतील लोकांना  काय आवडतं  या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देत असतो. जगण्याची पध्द्ती बदल्यामुळे काळानूसार आपण सुध्दा महागडया वस्तू घेऊन कशी आपली इच्छा पुर्ण करता येईल. याकडे  आपलं लक्ष अधिक असतं. पण याचा नकारात्मक परिणाम म्हणजे आपल्या सगळ्या गरजा तर पूर्ण होतात. पण महिन्याच्या अखेरिस  खिसा रिकामा झालेला असतो. या परिस्थितीपासून वाचण्यासाठी काही गोष्टीचीं काळजी घेणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया  महिन्याच्या शेवटी सुध्दा पैसे पूरवायचे असतील तर  नियोजन कसं असायला हवं. 

आधीच्या काळात सुद्धा हेअरकट केले जात होते. पण  त्यासाठी केला जाणारा खर्च हा प्रमाणात केला जायचा सध्याच्य परिस्थितीत हेअर स्टाईलवर गरज नसताना खूप खर्च केला जातो. एवढ करून सुध्दा मनासारखे केस दिसतील कि नाही या बाबत शंकाच आहे. म्हणून  हेअरस्टाईल करत असताना स्वतःच्या  डोक्याला चांगली दिसेल आणि जास्त खर्चीक ठरणार नाही अशी करा. 

घड्याळ महागड्या  ब्रॅण्डचे वापरण्याची फॅशन गेल्याकाही वर्षापासून आहे. प्रत्येक घड्याळात एकच वेळ दिसत असल्यामुळे  तुम्ही महागडी घडयाळ वापरणं थांबवा. कारण त्यामुळे गरज नसताना तुमचा जास्त खर्च होण्याची शक्यता असते.  मोबाईलच्या बाबतीत सुध्दा तेच उदाहरण तुम्हाला पहायला मिळेल कारण जर तुम्ही जास्त महागडा फोन विकत घेतला तर तो चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून जास्त महागडा फोन वापरू नका. 


 

इतरांना आकर्षीत करण्याच्या प्रयत्नात तुम्ही महागडे कपडे खरेदी करू नका. कारण यामुळे  खर्च जास्त होतो आणि एकदा घातल्यानंतर कपडे नकोसे वाटायला लागतात. म्हणून कपडे खरेदी करत असताना जरा नियंत्रण ठेवा. तसंच शूज घेताना सुद्धा ब्रॅण्डच्या वस्तू घेण्यात पैसे खर्च करू नका. 

Web Title: know changes that save money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.