ही रहस्यमय रेल्वे अचानक झाली होती गायब, आजही उलगडलं गेलं नाही कोडं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 05:54 PM2021-08-28T17:54:53+5:302021-08-28T17:58:24+5:30

या रहस्यमय घटनेबाबत सांगितलं जातं की, ही रेल्वे आपल्या वेळेआधी म्हणजे ७१ वर्ष मागे म्हणजेच भूतकाळात गेली होती.

Know about mysterious zanetti train which entered into a tunnel and disappeared mysteriously | ही रहस्यमय रेल्वे अचानक झाली होती गायब, आजही उलगडलं गेलं नाही कोडं

ही रहस्यमय रेल्वे अचानक झाली होती गायब, आजही उलगडलं गेलं नाही कोडं

googlenewsNext

रेल्वे आणि प्लॅटफॉर्म्सशी संबंधित अनेक किस्से तुम्ही याआधी ऐकले असतील. पण या सगळ्यात खास किस्सा आहे इटलीच्या त्या रेल्वेचा जी प्रवाशांना घेऊन अचानक गायब झाली होती. ही घटना आहे १९११ मधील. ज्यात १०६ लोकांना घेऊन जात असलेली एक रेल्वे भुयारी मार्गात शिरताच रहस्यमयपणे गायब झाली होती. या रेल्वेचा आजपर्यंत काहीच पत्ता लागला नाही की, ती गेली कुठे?

या रहस्यमय घटनेबाबत सांगितलं जातं की, ही रेल्वे आपल्या वेळेआधी म्हणजे ७१ वर्ष मागे म्हणजेच भूतकाळात गेली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही रेल्वे १८४० मध्ये मेक्सिकोमध्ये पोहोचली होती. त्यामुळे या रेल्वे भूताची रेल्वे असंही म्हटलं जात होतं.

मेक्सिकोतील एका डॉक्टरने दावा केला होता की, ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते. तिथे रहस्यमयपणे १०४ लोकांना दाखल करण्यात आलं होतं.  पण ते सगळेच्या सगळेच वेडे झाले होते. पण ते हे नक्की सांगू शकत होते की, ते इथे रेल्वेने आले आहेत. 

यापेक्षाही हैराण करणारी बाब ही होती की, त्या काळात अशी कोणती रेल्वेही नव्हती. जी रोमहून थेट मेक्सिकोमध्ये पोहोचेल. हैराण करणारी बाब म्हणजे हे लोक मेक्सिकोला आल्याचा कोणताही रेकॉर्ड नोंदवलेला नव्हता.
ही अजब घटना आजही जगभरातीलल लोकांसाटी रहस्य बनून आहे. त्याहून मोठं रहस्य हे आहे की, इटली, रशिया, जर्मनी आणि रोमानियातील अनेक भागात ही रेल्वे बघण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. प्रत्येकवेळी जी रेल्वे बघण्याचा लोकांनी दावा केला, ती ठीक तशीच रेल्वे होती जशी १९११ मध्ये गायब झाली होती.
 

Web Title: Know about mysterious zanetti train which entered into a tunnel and disappeared mysteriously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.