शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या कोडवर्ड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल माहीत तर जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 14:04 IST

औषधांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या या कोडबाबत तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मूर्ख बनवू शकणार नाहीत.

डॉक्टरकडून आल्यावर प्रत्येक घरात एक गोष्ट नेहमीच बोलली जाते की, डॉक्टरने चिठ्ठीत काय लिहिलं समजलं नाही? मुळात डॉक्टर काही कोडचा वापर करतात जे केवळ डॉक्टर आणि मेडिकल स्टोरवाल्यांनाच माहीत असतात. जास्तीत जास्त लोकांना डॉक्टरने काय लिहिलं हे कळत नाही आणि मग त्यावरून चिडचिड होते. पण आता आम्ही डॉक्टरकडून चिठ्ठीवर लिहिण्यात येणाऱ्या कोडबाबत सांगणार आहोत. म्हणजे तुमची चिडचिड होणार  नाही.

डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर जे लिहितात ते त्यांचे सीक्रेट कोड असतात. जे सामान्य लोकांना समजणं अवघड असतं. औषधांच्या चिठ्ठीवर लिहिलेल्या या कोडबाबत तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला मूर्ख बनवू शकणार नाहीत. जर प्रिस्क्रिप्शनवर Rx लिहिलं असेल तर त्याचा अर्थ उपचार असा होतो आणि qD चा अर्थ दररोज, qOD चा अर्थ प्रत्येक एक दिवस सोडून, qH चा अर्थ प्रत्येक तासाला, S चा अर्थ च्याशिवाय आणि C चा अर्थ च्यासोबत. (हे पण वाचा : टॅबलेटच्या पॅकेटवर लाल रंगाची रेष का असते? माहीत नसेल तर होईल मोठं नुकसान)

त्यासोबतच डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर अनेकदा SOS लिहितात. याचा अर्थ असा होतो की,औषध तेव्हाच खायचं आहे जेव्हा कोणत्या प्रकारची इमरजन्सी असेल किंवा जास्त त्रास होत असेल. AC चा अर्थ जेवणाआधी, PC चा अर्थ जेवणानंतर, BID चा अर्थ दिवसातून दोनदा, TID चा अर्थ दिवसातून तीन वेळा आणि PO चा अर्थ होतो की, औषध इंजेक्शन किंवा कोणत्या वेगळ्या प्रकारे घ्यायचं नाही. हे औषध केवळ पाण्यासोबत घ्यायचं आहे. 

प्रिस्क्रीप्शनवर लिहिलेल्या Ad Lib चा अर्थ होतो की, डॉक्टरने जेवढ्या प्रमाणात औषध घ्यायला सांगितलं तेवढंच औषध घ्यायचं आहे. ड्रॉप्सच्या औषधांसाठी डॉक्टरांचा सीक्रेट कोड GTT असा असतो. इतकंच नाही तर Tw चा अर्थ आठवड्यातून दोनदा, QAM चा अर्थ रोज सकाळी, QP चा अर्थ प्रत्येक रात्री, Q4H चा अर्था दर चार तासांनी, HS चा अर्थ झोपताना आणि PRN चा अर्थ गरजेनुसार औषध घेणं असा होतो. (हे पण वाचा : टॅबलेट्सच्या पॅकेटवर रिकामी स्पेस का दिलेली असते? कधी केलाय का विचार तुम्ही....)

जर डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शनवर bd किंवा bds लिहिलेलं असतं तर त्याचा अर्थ होतो की, औषध केवळ दोनदा घ्यायचं आहे. त्यासोबच TDS चा अर्थ औषध तीनवेळा घ्यायचं आहे, QTDS चा अर्थ औषध दिवसातून चार वेळा घ्यायचं आहे, OD चा अर्थ दिवसातून एकदा, BT चा अर्थ झोपताना आणि BBF चा अर्थ नाश्त्याआधी. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सHealth Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटके