आधी Kiss केलं, मग त्याच्या तोंडात बोट घातलं...सापासोबत स्टंट करणं व्यक्तीला पडलं महागात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:12 IST2023-02-07T13:10:40+5:302023-02-07T13:12:04+5:30

संतोष कुमार गौतमने एक साप पकडला आणि कधी त्याच्या तोंडात बोट टाकत होता तर कधी त्याला किस करत होता. इतकंच नाही तर त्याला हाताला गुंडाळून मस्ती करत होता. काही लोकांनी संतोषला असं करण्यापासून रोखलं होतं.

Kissed a snake put a finger in mouth lost its life while stunts | आधी Kiss केलं, मग त्याच्या तोंडात बोट घातलं...सापासोबत स्टंट करणं व्यक्तीला पडलं महागात.

आधी Kiss केलं, मग त्याच्या तोंडात बोट घातलं...सापासोबत स्टंट करणं व्यक्तीला पडलं महागात.

उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एका व्यक्तीला सापासोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं. यात त्याला त्याचा जीव गमवावा लागला. 40 वर्षीय संतोष कुमार गौतमने एक साप पकडला आणि कधी त्याच्या तोंडात बोट टाकत होता तर कधी त्याला किस करत होता. इतकंच नाही तर त्याला हाताला गुंडाळून मस्ती करत होता. काही लोकांनी संतोषला असं करण्यापासून रोखलं होतं.

मृत संतोषला विषारी सापांना पकडण्याची आवड होती. परिसरात कुठेही विषारी साप निघाले तर संतोष तिथे पोहोचून सापाला पकडत होता आणि नंतर त्यांना जंगलात नेऊन सोडत होता. जमुआ गावात असाच एक साप निघाला तर गावातील लोकांनी संतोषला बोलवलं. संतोषने केवळ 10 मिनिटात विषारी सापाला पकडलं. त्यानंतर कपड्यात गुंडाळून त्याला आपल्या घराजवळ आणलं.

नंतर गावातील लोकांसमोर तो सापाला हाताला गुंडाळून स्टंटबाजी करू लागला होता. अनेक लोकांनी त्याला असं न करण्यास सांगितलं. पण त्याने कुणाचं ऐकलं नाही. संतोषने सापाला अनेक आपल्या जिभेने स्पर्श केला. कधी तो सापाला खांद्यावर घेत होता तर कधी जमिनीवर सोडत होता. यादरम्यान सापाने त्याला दंश मारला. त्याला लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्याची स्थिती जास्त बिघडली तर त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं. जिथे त्याचा मृत्यू झाला.

गावातील लोकांनी सांगितलं की, दारूच्या नशेत संतोष सापासोबत स्टंट करत होता. त्याला असं करण्यापासून रोखण्यातही आलं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतोषचा मृतदेह ताब्यात घेतला. संतोषच्या वडिलांनी सांगितलं की, शेजारच्या गावातील एक तरूण संतोषला साप पकडण्यासाठी सोबत घेऊन गेला होता. जर हॉस्पिटलमध्ये पोहोचायला उशीर झाला नसता तर त्यांचा मुलगा वाचला असता.

Web Title: Kissed a snake put a finger in mouth lost its life while stunts