ज्या राणीवर संशय तिला लोखंडी अंतर्वस्त्र देत होते राजा, लॉक लावण्याची होती व्यवस्था!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:59 IST2025-03-01T16:50:38+5:302025-03-01T16:59:02+5:30
Viral Video : या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, शेकडो वर्षाआधी एखाद्या राजाला त्याच्या राणीवर संशय असायचा तेव्हा ते तिला लोखंडापासून तयार अंडरविअर वापरण्यास सांगत होते

ज्या राणीवर संशय तिला लोखंडी अंतर्वस्त्र देत होते राजा, लॉक लावण्याची होती व्यवस्था!
Viral Video : जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये राजेशाही जवळपास संपली आहे. पण त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची चर्चा आजही होत राहते. राजे-महाराजे कशाप्रकारे आलिशान जीवन जगत होते, हे वेगवेगळ्या सिनेमांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पण त्यांच्या काही अशाही गोष्टी असतात, ज्या समोर येत नाही. अशीच एक बाब म्हणजे त्यावेळी राजे-महाराजे जेव्हा युद्धावर किंवा दौऱ्यावर जात होते, तेव्हा राण्यांनी दगा करू नये किंवा इतर कुणीशी संबंध ठेवू नये म्हणून काय करायचे? हे सांगणार एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, शेकडो वर्षाआधी एखाद्या राजाला त्याच्या राणीवर संशय असायचा तेव्हा ते तिला लोखंडापासून तयार अंडरविअर वापरण्यास सांगत होते. इतकंच नाही तर त्यावर लॉकही लावत होते.
@desijourneyofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात दिसतं की, एका व्यक्तीकडे अनेक जुन्या वस्तू आहेत. व्हिडिओत त महिलांसाठी बनवलेली लोखंडी अंडरविअरही दाखवत आहे. तो सांगतो की, ही महिलांची अंडरविअर आहे. ज्या राजांना आपल्या राणीवर विश्वास नसायचा, ते त्यांना अशाप्रकारे लॉक करायचे. हे कमीत कमी ५०० वर्ष जुनी आहे. व्हिडिओत तुम्हि अंडरविअरचं डिझाइनही बघू शकता. डिझाइन असं करण्यात आलं आहे की, त्यांना त्यांच्या रोजच्या क्रिया करता याव्यात. याचा वापर राणीनं दगा देऊ नये म्हणून केला जात होता. हे असेच राजे करायचे ज्यांना त्यांच्या राणीवर संशय असायचा.
या व्हिडिओत देण्यात आलेली माहिती किती सत्य आहे याबाबत लोकमत कोणताही दावा करत नाही. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १८ कोटींपेक्षा जास्त वेळा बघण्यात आलंय. २४ लाख लोकांनी व्हिडीओ लाइक केला तर ४५ हजार लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. इतकंच नाही तर १ कोटी ४८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. लोक यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.