VIDEO : माकडाने किंग कोब्राची शेपटी खेचली, सापाने केला हल्ला आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 12:27 IST2023-05-23T12:26:54+5:302023-05-23T12:27:16+5:30

Viral Video : सामान्यपणे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंमध्ये माकडाला तुम्ही झाडांवर उड्या मारताना पाहिलं असेल. शिकारी वाघाला किंवा बिबट्याला त्रास देतानाचेही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.

King cobra and monkey fight video viral funny video snake attack | VIDEO : माकडाने किंग कोब्राची शेपटी खेचली, सापाने केला हल्ला आणि मग....

VIDEO : माकडाने किंग कोब्राची शेपटी खेचली, सापाने केला हल्ला आणि मग....

King Cobra Monkey Fight Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे बघून लोक कधी हसतात तर कधी हैराण होतात. तर काही व्हिडीओ आपल्या कल्पनेच्या बाहेरचे असतात. जंगलात दोन प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. दोनपैकी एका प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो.

पण प्राण्यांमध्ये गमती-जमती करणारा एक प्राणी म्हणजे माकड. माकडांचे कारनामे पाहून लोक नेहमीच अवाक् होतात. असाच एक हैराण करणारा व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. मुंगूस आणि सापाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आता माकड आणि सापाचा एक भयान व्हिडीओ बघा.

सामान्यपणे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंमध्ये माकडाला तुम्ही झाडांवर उड्या मारताना पाहिलं असेल. शिकारी वाघाला किंवा बिबट्याला त्रास देतानाचेही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण आता जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात माकड किंग कोब्रा सापाला हैराण करताना दिसत आहे. माकड किंग कोब्रा सापाची शेपटी खेचतो आणि सापही यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी माकडावर हल्ला करतो. अशात माकड स्वत:ला वाचवतो.

माकड आणि किंग कोब्रा यांच्यातील ही लढाई अधुरी राहते आणि दोघेही निघून जातात. कुणीतरी दोघांच्या लढाईचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि इंस्टाग्रामवर अपलोड केला. हा व्हिडीओ shnoyakam नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 6 दिवसांआधी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला 70 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.
 

Web Title: King cobra and monkey fight video viral funny video snake attack