वर्षाला ₹32 लाख कमावते ही महिला; ना शिक्षणाची गरज, ना डिग्रीची आवश्यकता! मस्त सुरू आहे जॉब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 19:30 IST2023-07-18T19:28:05+5:302023-07-18T19:30:14+5:30
काही नोकऱ्यांसाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. मात्र काही, मणूस बघत बघत शिकत असतो. त्याच्या पात्रता आणि अनुभवानुसार त्याची सॅलरी ठरत असते.

वर्षाला ₹32 लाख कमावते ही महिला; ना शिक्षणाची गरज, ना डिग्रीची आवश्यकता! मस्त सुरू आहे जॉब
जीवन जगताना एखाद्या व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरीची आवश्यकता असते. काही नोकऱ्यांसाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असते. मात्र काही, मणूस बघत बघत शिकत असतो. त्याच्या पात्रता आणि अनुभवानुसार त्याची सॅलरी ठरत असते. एका महिलेनेही अशाच एका नोकरीसंदर्भात लोकांना माहिती दिली आहे.
महिलेनं दिली तिच्या जॉबची माहिती -
या महिलेचे नाव आहे केली इव्हान्स (Kelly Evans). द सनने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या एसेक्समध्ये राहणाऱ्या इव्हान्स पूर्वी एक रिअल इस्टेट एजन्सी चालवत होत्या. मात्र, त्यांना त्यांच्या या बिझनेसपेक्षाही एक असे काम आवडले, ज्यासाठी शिक्षणाची आवश्यकताच नाही. मात्र पैसे प्रचंड मिळतात. त्यांनी 2016 पासून कुत्र्यांना फिरवण्याचे आणि त्यांची देखरेख करण्याचे काम सुरू केले. त्या आता वेगवेगळ्या क्लाइंट्सच्या एकूण 30 कुत्र्यांना फिरवतात आणि त्यांना या बिझनेसपासून वर्षाला 32 लाख रुपये आरामात मिळतात. महत्वाचे म्हणजे, त्यांचा या पैशांनी एक घर खरेदी करण्याचा विचार आहे.
46 व्या वर्षी सुरू केली नोकरी -
केली यांचे वय 46 वर्ष एवढे आहे. सरुवातीला तिच्या मित्रांनी तिच्या करिअर बदलण्याला सपोर्ट केला नाही. मात्र नंतर, त्यांना वाटले की हे योग्य आहे. केलीचे म्हणणे आहे की, तिला तिच्या कुत्र्याला सोडून कामावर जाणे अपराध्यासारखे वाटत होते. अशात तिने हे काम सुरू केले. ज्यात त्यांच्या डिग्रीचा शून्य उपयोग होता. खरे तर ती, हा आपला ड्रीम जॉब असल्याचे सांगते. तसेच, तिला कुत्रा हा प्राणी आवडतो आणि हा तिचा ड्रीम जॉब आहे. एखादी अशिक्षित व्यक्तीही हा जॉब करू शकते, असेही ती सांगते.