कस्तुरी काय असते आणि बाजारात त्याला किती किंमत मिळते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:50 IST2025-01-29T13:49:38+5:302025-01-29T13:50:06+5:30
कस्तुरी येते कुठून? खरी कस्तुरी कशी ओळखायची? कस्तुरीला बाजारात किती किंमत मिळते? असे काही प्रश्न लोकांच्या मनात येतात. याच प्रश्नांची उत्तर आज जाणून घेणार आहोत.

कस्तुरी काय असते आणि बाजारात त्याला किती किंमत मिळते?
तुम्ही पाहिलं असेल की, अनेक धार्मिक स्थळांवर काही लोक ओरिजनल कस्तुरी विकत असल्याचं बघायला मिळतं. असं म्हणतात की, कस्तुरीमधून खूप सुगंध येतो. तसेच कस्तुरीचा अनेक धार्मिक कार्यातही वापर केला जातो. आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासही यानं फायदा मिळतो. पण कस्तुरी येते कुठून? खरी कस्तुरी कशी ओळखायची? कस्तुरीला बाजारात किती किंमत मिळते? असे काही प्रश्न लोकांच्या मनात येतात. याच प्रश्नांची उत्तर आज जाणून घेणार आहोत.
काय असते कस्तुरी?
कस्तुरी हरणाच्या नाभिजवळ असलेली एक पिशवी असते. दिसायला ती अंडाकार 3-7.5 सेंटीमीटर लांब आणि 2.5-5 सेंटीमीटर रूंद असते. याचा सुगंध हरणाला वेड लावतं. पण त्याला माहीत नसतं की, हा सुगंध कुठून येत आहे. हरीण याच सुगंधाचा शोध घेत फिरत असतं.
सायन्सनुसार, काही नर हरणांमध्ये मस्क ग्लॅंड नावाचा एक अवयव असतो. जो एक लिक्विड प्रोड्यूस करतो. हे लिक्विड एका जागी जमा होतं. ज्याला कस्तुरी म्हटलं जातं. ही छोटी पिवशी नाभिजवळ असते.
कोणत्या हरणांमध्ये असते कस्तुरी?
कस्तुरी सामान्यपणे हिमालयन मस्क डिअरमध्ये आढळते. ज्याचं वैज्ञानिक नाव 'मास्कस क्रायसोगो' असं आहे. ही केवळ नर हरणामध्ये असते आणि हरीण जेवढं तरूण असेल कस्तुरी तेवढीच मोठी राहते. ही हरीण आशियात आढळतात. या हरणांना इतर हरणांसारखे शिंगही नसतात. जगात इतर असेही काही प्राणी आहेत. ज्यांच्या काही ग्रंथीमधून सुगंध येतो. एका हरणामधून साधारण २५ ते ५० ग्रॅम कस्तुरी मिळते. याच कारणाने हरणांची मोठी शिकार केली जाते.
किती मिळते किंमत?
कस्तुरीमधून खूप सुगंध येतो. त्यामुळे याचा वापर अत्तर, सेंट बनवण्यासाठी केला जातो. सोबतच अनेक उपचारांमध्ये याचा वापर केला जातो. सोबतच धार्मिक कार्यातही याचा वापर केला जातो. याची खूप डिमांड असल्यानं हरणांची तस्करीही केली जाते.
तशी तर कस्तुरीची किंमत हरणाच्या प्रजातीवर ठरते. तसेच बाजारात यापासून तयार प्रोडक्ट्सही खूप महागडे मिळतात. एका रिपोर्टनुसार, याचं पावडर ३० हजार रूपये भावानं बाजारात विकलं जातं. तर याचं तेल १० हजार रूपयांनी विकलं जातं.