शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आलिया गावात अजब वरात, पोरीला न्यायला JCB दारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 12:19 IST

अनोख्या वरातीची गावात चर्चा

नवी दिल्ली: लग्न सोहळा संपन्न झाल्यावर नवरा-नवरी सजवलेल्या गाडीतून घरी जातात. तुम्ही अनेकदा अशा सजवलेल्या गाडी पाहिल्यादेखील असतील. मात्र कर्नाटकमध्ये एक नवऱ्यानं नव्या नवरीला घरी नेण्यासाठी चक्क जेसीबी आणला. कर्नाटकमधील पुत्तूलमध्ये झालेल्या या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. कारण नवरीला नेण्यासाठी जेसीबी आणण्यात येईल, याची लग्नाला आलेल्या कोणालाही कल्पना केली नव्हती. नव्या नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी चक्क जेसीबी आणणाऱ्या नवऱ्याचं नाव चेतन असं आहे. चेतन जेसीबी चालवतो. त्यामुळे जेसीबीमधून बायकोला घरी नेण्याचा विचार त्याच्या मनात आला. पुत्तूलच्या परपुंजा तालुक्यात चेतनचं ममतासोबत लग्न झालं. लग्न करुन दोघे कुटुंबासह हॉलबाहेर आले, त्यावेळी समोर जेसीबी उभा होता. यानंतर चेतन आणि ममता जेसीबीमध्ये बसले. विशेष म्हणजे हे नवदाम्पत्य जेसीबीच्या बकेटमध्ये बसलं होतं. लग्नात काहीतरी हटके करायचं, असं चेतननं आधीच ठरवलं होतं. त्यामुळे याची तयारी त्यानं आधीपासूनच केली होती. चेतन आणि ममताचं लग्न सुरू असताना हॉलबाहेर फुगे लावलेला जेसीबी तयार होता. यामध्ये चेतनच्या मित्रांनी त्याची मदत केली. लग्न सोहळा संपल्यावर चेतन आणि ममता जेसीबीच्या बकेटमध्ये बसले आणि घराच्या दिशेनं निघाले. अनेकदा नवदाम्पत्य लक्झरी गाडीतून घरी येतं. मात्र चेतन आणि ममता चक्क जेसीबीनं घरी पोहोचले. ही अनोखी वरात पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी झाली होती.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न