जबरा फॅन! 15 तास खर्च करून पाठीवर काढला मोदींच्या चेहऱ्याचा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 10:34 IST2018-05-08T10:34:39+5:302018-05-08T10:34:39+5:30

Karnataka Man Gets PM Modi Tattoo On His Back In 15-Hour Session | जबरा फॅन! 15 तास खर्च करून पाठीवर काढला मोदींच्या चेहऱ्याचा टॅटू

जबरा फॅन! 15 तास खर्च करून पाठीवर काढला मोदींच्या चेहऱ्याचा टॅटू

रायचूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते सगळीकडेच आहेत. तसंच मोदी न आवडणाऱ्या लोकांची संख्याही तितकीच आहे. पण कर्नाटकातील मोदींचा एक चाहता सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील एका व्यक्तीनं आपल्या शरीरावर मोदींचा मोठा टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू पूर्ण करण्यासाठी टॅटू आर्टिस्टला जवळपास १५ तास लागले.

कर्नाटकमधल्या रायचूरमध्ये राहणाऱ्या बसवराज यांनी आपल्या पाठीवर मोदींचा टॅटू गोंदवून घेतला आहे. मोदींना पाठिंबा दर्शविण्यासाठी बसवराज यांनी टॅटू गोंदवून घेतला.  जे गेल्या कित्येक वर्षांत शक्य झालं नाही ते मोदींनी ४ वर्षांत करून दाखवलं. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मी हा टॅटू पाठीवर गोदंवून घेतला असल्याची माहिती बसवराज यांनी दिली. बसवराज त्यांच्या गावापासून ४०० किलोमीटरचं अंतर पार करून तो बंगळूरुमध्ये गेले होते.

नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी त्याच्या नावाचा उल्लेख केला. ‘तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, जेव्हा मोदींनी सर्वांसमोर माझ्या नावाचा उल्लेख केला. प्रचारात मोदींनी मला सक्रिय सहभाग घेण्यास सांगितला आहे. मी यापुढे जोमानं काम करेन’ असंही ते म्हणाले होते. बसवराज यांनी काढलेला टॅटू हा कायमस्वरूपी आहे की तात्पुरता याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. 



 

Web Title: Karnataka Man Gets PM Modi Tattoo On His Back In 15-Hour Session