'या' हॉटेलमधे एक रात्र राहण्यासाठी लागतात केवळ ८५ रूपये, पण एका गोष्टीचा करावा लागेल त्याग!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:40 PM2019-11-16T12:40:35+5:302019-11-16T12:42:39+5:30

एका विचित्र अटीमुळे या हॉटेलची होऊ लागलीये सगळीकडे चर्चा...

Japans cheapest hotel just 85 rupees charge per night but you have to forget privacy | 'या' हॉटेलमधे एक रात्र राहण्यासाठी लागतात केवळ ८५ रूपये, पण एका गोष्टीचा करावा लागेल त्याग!

'या' हॉटेलमधे एक रात्र राहण्यासाठी लागतात केवळ ८५ रूपये, पण एका गोष्टीचा करावा लागेल त्याग!

Next

एखाद्या दुसऱ्या शहरात जावं लागलं तर अनेकांना एखाद्या हॉटेलमधे थांबावं लागतं. आता तर हॉटेलचं भाडंही काहीच्या काही वाढलं आहे. पण जपानमध्ये एक हॉटेल आहे, ज्याचं भाडं केवळ १३० युआन म्हणजे भारतीय करन्सीनुसार हे ८५.९० रूपये इतकं. फुकुओकामधील हे हॉटेल सर्वात स्वस्त हॉटेल झालं आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. या हॉटेलमधे थांबण्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागते. 

बिझनेस रियोकान असाही असं या अनोख्या हॉटेलचं नाव आहे. मुख्य शहरापासून केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर हे हॉटेल आहे. तसेच या हॉटेलमध्ये सर्वच आधुनिक सुविधाही आहेत. पण इथे एका गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणजे या हॉटेलमधे राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीचा त्याग करावा लागतो. आता म्हणाले तो कसा? तर तुम्ही ज्या रूममध्ये थांबाल, त्या हॉटेलच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल.

जगाला दिसेल तुम्ही काय करताय

म्हणजे तुम्हाला या हॉटेलमधे राहण्यासाठी तुमच्या प्रायव्हसीचा त्याग करावा लागेल. जेव्हा तुम्ही या हॉटेलच्या रूममध्ये असाल तेव्हा सगळं जग तुम्हाला बघू शकेल. अनेक लोकांनी या ऑफरचा लाभ घेतला आणि घेतही आहेत. हॉटेलमधे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही खास ऑफर उपलब्ध आहे. 

तशी एक चांगली बाब ही आहे की, कॅमेरा हॉटेलच्या रूममध्ये लावलेले आहेत. बाथरूममध्ये कॅमेरा नाहीत. तसेच लोक केवळ तुम्हाला बघू शकतील, त्यांना तुमचा आवाज येणार नाही. तसेच या रूममध्ये टीव्ही सुद्धा ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

कशी सुचली असेल ही आयडिया

स्थानिक माध्यमांशी बोलताना हॉटेल मॅनेजमेंटने सांगितले की, हॉटेलमधील रूम नंबर ८ ची बुकींग फार कमी होत होती. त्यामुळे मॅनेजमेंटने काही असं करण्याचा निर्णय घेतला की, ज्याने हॉटेलची चर्चा होईल. यातूनन लाइव्ह स्ट्रींमिंगची आयडिया समोर आली.


Web Title: Japans cheapest hotel just 85 rupees charge per night but you have to forget privacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.