शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

काय सांगता? 'हा' अब्जाधीश ट्विटर फॉलोअर्सना देणार तब्बल 64 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 10:19 IST

अब्जाधीशाने ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देअब्जाधीशाने ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.युसाकू मीजावा असं अब्जाधीशाचं नाव असून त्यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना 64 कोटी मिळणार आहेत. मीजावा यांचे ट्विटरवर 6.8 मिलियन फॉलोअर्स आहे.

ट्विटरवर अनेक जण ट्विट करून विविध घडामोडींची माहिती देत असतात. दिग्गज व्यक्तींनाही फॉलो करता येतं. तसेच त्यांचं ट्विट हे रिट्विट करता येतं. मात्र ट्विटरवर फॉलो केल्यास पैसे मिळतील असं कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका अब्जाधीशाने ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. युसाकू मीजावा असं जपानमधील अब्जाधीशाचं नाव असून त्यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांना 64 कोटी मिळणार आहेत. 

43 वर्षीय मीजावा यांचे ट्विटरवर 6.8 मिलियन फॉलोअर्स आहे. 2010 मध्ये त्यांनी ट्विटरवर अकाऊंट सुरू केलं. मीजावा यांच्याकडे 2 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. आपल्याकडे पैसे वाटण्यासाठी रिकामा वेळ आहे. कोणतंही काम न करता एक ठराविक रक्कम मिळाली तर त्याला बेसिक इनकम म्हणता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. मीजावा यांनी नववर्षात पहिलं ट्विट केलं होतं. ज्या फॉलोअर्सनी त्यांचं ते ट्विट रिट्विट केलं आहे अशा 1 हजार लोकांना 64 कोटी रुपये देण्यात येणार आहे. 

उद्योगपती युसाकू मीजावा हे चंद्राला गवसणी घालणारे जगातले पहिले सर्वसामान्य व्यक्ती देखील ठरणार आहेत. ते स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून हा कारनामा करणार आहे. त्यांची ही अद्भूत ट्रिप 2023 मध्ये प्लॅन करण्यात आली असून या अनोख्या ट्रिपसाठी त्यांना एक महिला लाइफ-पार्टनरचा शोध आहे. युसाकू यांनी सोशल मीडियातून आवाहन केलं आहे की, त्यांना हा अनुभव स्पेशल महिलेसोबत शेअर करायचा आहे. काही दिवसांपूर्वीच 44 वर्षीय युसाकू यांचं 27 वर्षीय अभिनेत्री अयामेसोबत ब्रेकअप झालं. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या या प्लॅन्ड ट्रिपच्या निमित्ताने महिलांना लाइफ पार्टनरसाठी अप्लाय करण्याचं आवाहन केलं आहे. 

युसाकू यांनी त्यांच्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली असून वेबसाइटवर अटींची यादीही दिली आहे. सोबतच तीन महिन्यांची अर्ज करण्याची लांबलचक प्रक्रियाही सांगितली आहे. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, अर्ज करणाऱ्या महिला सिंगल आणि 20 च्यावर त्यांचं वय असावं. त्यांचे विचार सकारात्मक असावेत आणि स्पेसमध्ये जाण्याची आवडही असावी. या वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी ही शेवटची तारीख असेल. तर पार्टनरची निवड मार्चच्या शेवटच्या महिन्यात केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Elections : 'आप' विरोधात भाजपाचा 500 कोटींचा दावा

'आज के शिवाजी' पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना- शिवसेना

संतप्त शिवप्रेमींच्या तीव्र निदर्शनानंतर ‘आज के शिवाजी’ पुस्तक घेतले मागे

मोदी-शाह-डोवालांच्या फोटोंवर क्रॉस, प्रज्ञा सिंह ठाकूरांना मिळाले संशयित पत्र

 

टॅग्स :Twitterट्विटर