वेळेच्या ५ मिनिटे आधी ऑफिसला बोलावलं; कंपनीला कर्मचाऱ्यांना द्यावी लागली लाखोंची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:24 IST2025-03-11T14:21:42+5:302025-03-11T14:24:50+5:30
Japanese Employees five minutes early : सोशल मीडियावर या गोष्टीची रंगलीय तुफान चर्चा

वेळेच्या ५ मिनिटे आधी ऑफिसला बोलावलं; कंपनीला कर्मचाऱ्यांना द्यावी लागली लाखोंची भरपाई
Japanese Employees five minutes early: जगात असे अनेक देश आहेत, जे वेळेला महत्त्व दिल्याने प्रगत देशांपैकी एक मानले जातात. येथे प्रत्येक गोष्ट वक्तशीर होण्याला प्राधान्य असते. पण नुकताच येथे एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. जपानमधील सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेच्या ५ मिनिटे आधी कार्यालयात बोलावल्याबद्दल कंपनीला त्यांना ५ कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागली. ही घटना जपानी इंटरनेट युजर्ससह जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.
वेळेपूर्वी कार्यालयात बोलावले
'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'नुसार, जपानमधील एका लहान शहरात गिनान मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नियमित नियोजित वेळेपेक्षा पाच मिनिटे आधी कामावर येण्याचे आदेश देण्यात आले. हा नियम शहराचे माजी महापौर हिदेओ कोजिमा यांनी लागू केला होता. मेयर हे त्यांच्या कडक व्यवस्थापन शैली आणि कामाच्या ठिकाणी शिस्तबद्ध वर्तनासाठी ओळखले जातात. त्यांनी सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी ८.२५ वाजता कार्यालयात येण्यास सांगितले. हे नियोजित वेळेच्या ५ मिनिटे आधी होते.
कर्मचाऱ्यांच्या तक्रारी
महापौरांच्या या आदेशाने सर्व १४६ कर्मचारी खूप नाराज झाले. त्यांनी या निर्णयाविरुद्ध तक्रार दाखल केली आणि थेट जपान फेअर ट्रेड कमिशनशी संपर्क साधला. आयोगाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि शहराच्या महापौरांना त्यांना १० मिलियन येनपेक्षा जास्त म्हणजेच ५९,२५,११३ रुपये भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
घटना इंटरनेटवर तुफान व्हायरल
जपानमधील ही घटना आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही घटना जपानी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः त्यांच्यासाठी जे त्यांच्या कंपनीतील ओव्हरटाइम कामाच्या संस्कृतीमुळे त्रस्त आहेत. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांनी कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे आणि म्हटले आहे की हा निर्णय जपानमधील ओव्हरटाइम काम करण्याची संस्कृती बदलण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.