फोटोतील स्कूल गर्ल सुंदर दिसते ना? तिचं गुपित वाचाल तर बसेल ४४० व्होल्टचा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:11 AM2020-01-14T11:11:03+5:302020-01-14T11:11:07+5:30

आजकाल समोर दिसतं ते खरं असेलच असं अजिबातच सांगता येत नाही. आता हेच बघा ना....या फोटोत तुम्हाला एक क्यूट जपानी मुलगी दिसत असेल.

This Japanese schoolgirl is actually a 42 year old man | फोटोतील स्कूल गर्ल सुंदर दिसते ना? तिचं गुपित वाचाल तर बसेल ४४० व्होल्टचा झटका!

फोटोतील स्कूल गर्ल सुंदर दिसते ना? तिचं गुपित वाचाल तर बसेल ४४० व्होल्टचा झटका!

Next

आजकाल समोर दिसतं ते खरं असेलच असं अजिबातच सांगता येत नाही. आता हेच बघा ना....या फोटोत तुम्हाला एक क्यूट जपानी मुलगी दिसत असेल. पण तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही की, फोटोतील मुलगी मुलगी तर नाहीच सोबतच ती स्कूल गर्लही नाही. मुळात तो एक लग्न झालेला, मुलं बाळं असलेला ४२ वर्षीय पुरूष आहे. त्याचं नाव आहे ताकुमा तानी.

ताकुमा तानीचा जन्म १९७७ मध्ये झाला होता. तो एक जपानी गायक आहे. सोशल मीडियात त्याचे अनेक फोटो आहेत ज्यात तो एक स्कूल गर्लच्या रूपात दिसतो. ताकुमाला हायस्कूलच्या दिवसांपासूनच म्युझिकमध्ये इंटरेस्ट होता. २८ व्या वर्षी त्याने एका म्युझिक बॅन्डही जॉइन केला होता. आणि ३४ वर्षी त्याने हा निर्णय घेतला की, तो एका स्कूल गर्लचं रूप धारण करेल. तेव्हापासून आतापर्यंत तो याच रूपात जगासमोर येतो.

ताकुमाला बघून कुणीही तो मुलगी नाही असा संशय घेऊ शकणार  नाही. त्याचे केस १६२ सेमी लांब आहेत आणि त्याचं वजनही केवळ ४७ किलो आहे. यात जराही शंका नाही की, असं रूप घेण्यासाठी भरपूर मेकअप करावं लागतं. पण ताकुमासाठी ही रोजचीच बाब झाली आहे. 

एक म्युजिशिअन आणि गायक असण्यासोबतच  ताकुमा एख टीव्ही पर्सनॅलिटी सुद्धा आहे. त्यासोबतच त्याने महिलांच्या कपड्यांचा एक ब्रॅन्डही लॉन्च केला आहे. ताकुमाचं लग्न झालं असून त्याला एक मुलगीही आहे. २०१६ मध्ये त्याने एक फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. त्यात तो एका स्कूल गर्लच्या रूपात दिसला होता. 

तो म्हणाला की, 'मला लोकांना हेच सांगायचं आहे की, तुम्हाला जे वाटतं ते करावं. कुणीला घाबरण्याची किंवा वाईट वाटून घेण्याची गरज नाही. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका'. 


Web Title: This Japanese schoolgirl is actually a 42 year old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.