(Image Credit : in.pinterest.co)
जपानचे कोट्यधीश उद्योगपती युसाकू मैइजावा हे चंद्राला गवसणी घालणारे जगातले पहिले सर्वसामान्य व्यक्ती ठरणार आहे. ते स्टारशिप रॉकेटच्या माध्यमातून हा कारनामा करणार आहे. त्यांची ही अद्भूत ट्रिप २०२३ मध्ये प्लॅन करण्यात आली असून या अनोख्या ट्रिपसाठी त्यांना एक महिला लाइफ-पार्टनरचा शोध आहे.
युसाकू यांनी सोशल मीडियातून आवाहन केलं आहे की, त्यांना हा अनुभव स्पेशल महिलेसोबत शेअर करायचा आहे. काही दिवसांपूर्वीच ४४ वर्षीय युसाकू यांचं २७ वर्षीय अभिनेत्री अयामेसोबत ब्रेकअप झालं. त्यामुळे त्यांना आता त्यांच्या या प्लॅन्ड ट्रिपच्या निमित्ताने महिलांना लाइफ पार्टनरसाठी अप्लाय करण्याचं आवाहन केलंय.
युसाकू यांनी त्यांच्या वेबसाइटवर याबाबत माहिती दिली असून वेबसाइटवर अटींची यादीही दिली आहे. सोबतच तीन महिन्यांची अर्ज करण्याची लांबलचक प्रक्रियाही सांगितली आहे. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, अर्ज करणाऱ्या महिला सिंगल आणि २० च्यावर त्यांचं वय असावं. त्यांचे विचार सकारात्मक असावेत आणि स्पेसमध्ये जाण्याची आवडही असावी.
या वेबसाइटवर अर्ज करण्यासाठी १७ जानेवारी ही शेवटची तारीख असेल. तर पार्टनरची निवड मार्चच्या शेवटच्या महिन्यात केली जाईल. गेल्या काही वर्षांपासून ते त्यांच्या स्पेस ट्रिपमुळे प्रायव्हेट पॅसेंजर म्हणूनही लोकप्रिय झाले आहेत. काय मग....करताय ना अर्ज?