शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

भारतातील 'या' वास्तूचे ५ पैकी चार मजले आहेत पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 17:38 IST

महालात कधीही गरमीचं वातावरण नसतं. या महालाचा सुंदर नजारा पाहण्यासारखा असतो. 

जगभरातील प्रसिध्द अशा अनेक ऐतिहासिक वास्तू भारतात आहेत. राजस्थानमध्ये अनेक प्राचीन वास्तूचं दर्शन तुम्हाला होईल. जगभरात प्रसिध्द असलेल्या ठिकाणांपैकी भारतात असलेल्या एका अनोख्या वास्तूंबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही इमारत पाण्यातील इमारत म्हणून ओळखली जाते. ही इमारत आतासुद्धा दोनशे वर्षांपूर्वी जशी होती तशीच उभी आहे.

भारतातील या  ऐतिहासिक वास्तूला जल महाल असं म्हटलं जातं. राजस्थानातील जयपूरमध्ये ही वास्तू आहे. खरं तर ही वास्तू एखाद्या महालाप्रमाणे आहे. जयपुर-आमेर  रस्त्यावर मानसागर तलावामध्ये याची स्थापना झाली आहे. हा महाल सवाई जयसिंहाने १७९९ मध्ये तयार केला  होता.

अरवली पर्वतात असलेल्या या महालाला मानसागर तलावाच्या मधोमध असल्यामुळे 'आई बॉल'  असं सुद्धा म्हणलं जातं. तसंच 'रोमँटिक महल' असं नाव या महालाला देण्यात आलं आहे. कारण तत्कालीन राजा आपल्या राणीसोबत चांगला वेळ घालवण्यसाठी या महालाचा वापर करत होता. याशिवाय मोठ्या सण- उत्सवांच्यावेळी या महालाचा वापर केला जात होता.  

पाच मजल्यांच्या असलेल्या या महालाची खासियत अशी आहे की, पाच मजल्यांपैकी फक्त एक मजला वर आणि बाकिचे तीन चार मजले पाण्याखाली आहेत. म्हणून या महालात कधीही गरमीचं वातावरण नसतं. या महालाचा सुंदर नजारा पाहण्यासारखा असतो.  रात्रीच्यावेळी या महालाला पाहण्याचा आनंद काही वेळगाच आहे.

तुमचा वाचून विश्वास बसणार नाही पण या जल महालातील  परिसरात एक लाखापेक्षा जास्त झाडं लावली आहेत.  दिवसरात्र या झाडांची काळजी घेतली जाते. जवळपास ४० माणसांचा समावेश झाडांचा सांभाळ करण्यासाठी केला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी येतात.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सJara hatkeजरा हटके